Asia Cup 2023 PAK A vs IND A | साई सुदर्शन याचं खणखणीत शतक, टीम इंडियाचा पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय
Asia Cup 2023 India A vs PAKISTAN A | टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत 8 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला आहे.
कोलंबो | आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया ए ने पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ए क्रिकेट टीमचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने पाकिस्तानवर 8 विकेट्से मात केलीय. यासह टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलीय. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 36.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. राजवर्धन हंगरगेकर आणि साई सुदर्शन हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.
टीम इंडियावर ‘साई’कृपा
टीम इंडियाकडून साई सुदर्शन याने सर्वाधिक नाबाद 104 धावांची खेळी केली. साईने या दरम्यान 3 सिक्स आणि 10 चौकार ठोकले. तर कॅप्टन यश धूल याने नाबाद 21 धावा केल्या. निकीन जोस याने 53 रन्स केल्या. तर अभिषेक शर्मा 20 याने 20 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून मुबासिर खान आणि मेहरान मुम्ताझ या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मात्र या निर्णयाचा फायदा घेत धमाका केला. राजवर्धन हंगरगेकर याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही कमाल करत पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं. पाकिस्ताने 2 फलंदाज हे झिरोवर बाद झाले. तर दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर एक जण 25 धावांवर नाबाद राहिला. या 5 जणांचा अपवाद वगळता प्रत्येकाला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी रोखलं. राजवर्धन याने पाकिस्तानला पंच देत 48 ओव्हरमध्ये 205 धावांवर ऑलआऊट केलं.
टीम इंडियाकडून राजवर्धन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मानव सुथार याने 3 फलंदाजांना बाद केलं. तर रियान पराग आणि निशांत सिंधू या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, हसीबुल्ला खान, कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहनवाज दहनी.
टीम इंडिया ए प्लेईंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.