IND vs PAK | बीडच्या Sachin Dhas चं दमदार अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई
India U19 vs Pakistan U19 | टीम इंडिया कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध बॅकफुटवर गेली होती. मात्र सचिन धस याने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. टीम इंडियावर वरचढ होऊ पाहणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना सचिनने बॅटिंगने चोप दिला.
दुबई | अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेत क्रिकेट टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून या सामन्यात मराठमोळ्या बीडच्या सचिन धस, आदर्श सिंह आणि आणि कॅप्टन उदय सहारन या त्रिकुटाने प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना विशेष योगदान देता आलं नाही. तर पाकिस्तानला भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाला 300 आधी रोखण्यात यश आलं. पाकिस्तानकडून मोहम्मद जीशान याने सर्वोत्तम बॉलिंग केली. मात्र सचिन धसच्या कचाट्यातून कुणीच वाचू शकला नाही.
टीम इंडियाची बॅटिंग
आदर्श सिंह आणि अर्शिन कुलकर्णी या सलामी जोडीने 39 धावांची भागीदारी केली. अर्शिन कुलकर्णी 24 धावा करुन आऊट झाला. आदर्शने 81 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. रुद्र पटेल 1 रन करुन आऊट झाला. तर कॅप्टन उदय सहारन याने टीम इंडियाचा डाव सावरला. उदयने 98 बॉलमध्ये 60 रन्स केल्या.
सचिन धसची फटकेबाजी
पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय बऱ्यापैकी योग्य ठरवला. पाकिस्तानने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके देत बॅकफुटवर ठेवलं. मात्र बीडच्या सचिन धस याने पाकिस्तानला त्यांच्या मोहिमेत 100 टक्के यशस्वी होऊन दिलं नाही. सचिन सातव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. सचिनने बॅकफुटवर गेलेल्या टीम इंडियासाठी निर्णायक अर्धशतकी खेळी केली. सचिनने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 58 धावांची झंझावाती खेळी केली. सचिनच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारण्यात यश आलं.
सचिन पाकिस्तान विरुद्ध चमकला
Sachin Dhas💪 58(42) Well played Sachin.
Finally one batter who showed Pakistani bowlers their place
📸 context-
1st : SIX to Zeeshan 2nd: SIX to Ubaid Shah 3rd: four to Zeeshan 4rth: Single handed huge SIX to amir#INDvPAK #PAKvIND https://t.co/iyHJ8QFIgp pic.twitter.com/5Eg0JoJDO3
— Varun Giri (@Varungiri0) December 10, 2023
सचिनने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. मात्र सचिनला मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद जीशान याने सचिनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सचिनच्या या खेळीमुळे बीड जिल्ह्यातील त्याच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे. त्यात आता टीम इंडियाचे गोलंदाज पाकिस्तानवर मात करुन हा आनंद द्विगुणित करतात का, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमिल हुसैन, शाहजैब खान, अझान अवेस, मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन आणि उबेद शाह.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी आणि नमन तिवारी.