सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद, म्हणाला, ‘काम होऊन जाईल…!’
हरभजन सिंग याने 12 मे रोजी एक ट्विट करत अर्जंट एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे, असं म्हणत त्याने आपल्या ट्विटमध्ये पत्ता लिहिला होता. यावर लगेचच सोनू सूदने लगेचच रिप्लाय करुन पोहोवलं जाईल, असा रिप्लाय केला. (Sonu Sood help Cricketer Harbhajan Singh)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात परप्रांतिय मजुरांसाठी देवदूत ठरला. 2020 मध्ये सोनूने अनेक कामगार, मजुरांना त्यांच्या गावी, घरी पोहोचण्यासाठी मोलाची मदत केली. इतकंच नाही तर अनेक गरजूंची भूक भागवण्याचं कामही त्याने केलं आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा भासतोय. गरजू आणि गंभीर रुग्णांना ते वेळेत मिळवून देण्याचं काम सोनू सूद करतोय. अशावेळी सोनू सूदने भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचीही मदत केलीय. (Actor Sonu Sood help Cricketer Harbhajan Singh For Remdesivir Injection)
हरभजनला मदतीची गरज
हरभजन सिंग याने 12 मे रोजी एक ट्विट करत अर्जंट एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे, असं म्हणत त्याने आपल्या ट्विटमध्ये पत्ता लिहिला होता. यावर लगेचच सोनू सूदने लगेचच रिप्लाय करुन पोहोचवलं जाईल, असा रिप्लाय केला.
1 remdesiver injection ? required (urgent) Hospital- Basappa hospital near Aishwarya fort , chitradurga , Karnatka Pls contact this no : 9845527157 ?
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 12, 2021
सोनूने भज्जीच्या ट्विटला काय रिप्लाय दिलाय.
कर्नाटकमधल्या बसप्पा हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीच्या उपचाराकरिता रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असल्याचं ट्विट भज्जीने केलं. तसंच भज्जीने हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केला. सोनूने हे ट्विट वाचून लगोलग रिप्लाय केला. भज्जी, पोहोचवलं जाईल, असं म्हणत त्याने ते इंजेक्शन पोहोचवलं देखील…!
Bhaji…Wil be delivered ☑️ https://t.co/oZeljSBEN3
— sonu sood (@SonuSood) May 12, 2021
‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’
सोनू सूद सातत्याने अनेकांच्या मदतीला धावून जात असल्यामुळे अनेकजण अवाक झालेत. काही दिवसांपूर्वी असाच एक अनुभव आलाय. नागपूरमधील एका तरुणीने वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत व्हेंटिलेटर मिळत नसल्याची अडचण सांगितली आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली. यावर सोनू सूद यांनी तात्काळ तिला आधार देत मदतीचं आश्वासन दिलं.
नागपूरच्या रोशनी बुराडे या तरुणीने ट्विट केलं, “माझे पप्पा कोरोना बाधित आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची खूप गरज आहे. संपूर्ण नागपूरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. सोनू सूद सर मला कृपया मदत करा. माझ्या पप्पांना वाचवा प्लिज. तुम्हीच मला मदत करु शकता.” यावर सोनू सूदने तात्काळ प्रतिसाद देत तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही. एका तासात त्यांना व्हेंटिलेटर मिळेल”, असं ट्विट केलं होतं.
(Actor Sonu Sood help Cricketer Harbhajan Singh For Remdesivir Injection)
हे ही वाचा :
कुलदीप यादव म्हणतो, “मला माही भाईची खूप आठवण येतीय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी….”
क्रिकेटर सुरेश रैनाने आजारी मावशीसाठी मागितला ऑक्सिजन, सोनू सूद म्हणाला- 10 मिनिटांत पोहोचेल
PHOTO | लई भारी! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विरुष्काने जमवले 11 कोटी