ऑक्सर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांचा धोनीकडून सन्मान, मैदानात आल्यानंतर दिलं स्पेशल गिफ्ट

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने द एलिफंट व्हिस्परर्स डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांचा सन्मान केला. ही डॉक्युमेंट्रीला ऑस्कर अवॉर्ड 2023 मिळाला आहे. या डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांची भूमिका खूपच गाजली होती.

ऑक्सर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांचा धोनीकडून सन्मान, मैदानात आल्यानंतर दिलं स्पेशल गिफ्ट
ऑक्सर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांचा धोनीकडून सन्मानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 8:53 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ चांगली कामगिरी करत आहे. सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेपॉक मैदानावर दिल्ली विरुद्धचा सामना जिंकला की चेन्नईचं प्लेऑफमधला मार्गही मोकळा होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी महेंद्र सिंह धोनी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ मधील कलाकार बोम्मन आणि बेल्ली यांची भेट घेतली. यावेळी फिल्म निर्माता कार्तिकी गोंसाल्विस सुद्धा होते. यावेळी धोनीने बोम्मन आणि बेल्ली यांना सीएसकेची 7 क्रमांकाची जर्सी भेट दिली. यावेळी धोनीसोबत मुलगी जीवाही होती.

‘द एलिफंट व्हिस्परर्स’टीमचं चेन्नई सुपर किंग्सद्वारे सन्मान करण्यात आला. यावेळी धोनीने त्यांना सीएसकेच्या दोन जर्सी दिल्या.13 मार्च 2023 हा दिवस भारतासाठी गौरवपूर्ण होता. कारण या दिवशी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत पुरस्कार मिळाला होता.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

या सुवर्ण क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. सीएसकेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “खास व्यक्तींसोबत खास क्षण”. तर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, आमचं मन जिंकणाऱ्या टीमला शुभेच्छा! बोमन, बेल्ली आणि फिल्म निर्माता कार्तिकी गोंसावलिस यांचा आदरतिथ्य करून आनंद वाटला.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

‘द एलिफंट व्हिस्परर्स’चित्रपटात बोम्मन आणि बेल्ली यांनी हत्तीच्या पिल्लांची केअरटेकर म्हणून भूमिका बजावली आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही शॉर्ट फिल्म कॅटेगरीत ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय फिल्म आहे.

चेन्नईची आयपीएल 2023 स्पर्धेतील कामगिरी

चेन्नईने आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. चेन्नईने 11 पैकी सहा सामने जिंकले आहेत. 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. 13 गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.