मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ चांगली कामगिरी करत आहे. सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेपॉक मैदानावर दिल्ली विरुद्धचा सामना जिंकला की चेन्नईचं प्लेऑफमधला मार्गही मोकळा होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी महेंद्र सिंह धोनी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ मधील कलाकार बोम्मन आणि बेल्ली यांची भेट घेतली. यावेळी फिल्म निर्माता कार्तिकी गोंसाल्विस सुद्धा होते. यावेळी धोनीने बोम्मन आणि बेल्ली यांना सीएसकेची 7 क्रमांकाची जर्सी भेट दिली. यावेळी धोनीसोबत मुलगी जीवाही होती.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’टीमचं चेन्नई सुपर किंग्सद्वारे सन्मान करण्यात आला. यावेळी धोनीने त्यांना सीएसकेच्या दोन जर्सी दिल्या.13 मार्च 2023 हा दिवस भारतासाठी गौरवपूर्ण होता. कारण या दिवशी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत पुरस्कार मिळाला होता.
Tudumm ? Special occasion with very special people ??#WhistlePodu #Yellove ? pic.twitter.com/AippVaY6IO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 10, 2023
या सुवर्ण क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. सीएसकेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “खास व्यक्तींसोबत खास क्षण”. तर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, आमचं मन जिंकणाऱ्या टीमला शुभेच्छा! बोमन, बेल्ली आणि फिल्म निर्माता कार्तिकी गोंसावलिस यांचा आदरतिथ्य करून आनंद वाटला.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’चित्रपटात बोम्मन आणि बेल्ली यांनी हत्तीच्या पिल्लांची केअरटेकर म्हणून भूमिका बजावली आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही शॉर्ट फिल्म कॅटेगरीत ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय फिल्म आहे.
चेन्नईने आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. चेन्नईने 11 पैकी सहा सामने जिंकले आहेत. 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला. 13 गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.