WTC FINAL 2023 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय, टीम इंडियात मोठा बदल

बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे टीम इंडियात नक्की काय बदल होणार हे जाणून घ्या.

WTC FINAL 2023 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय, टीम इंडियात मोठा बदल
Image Credit source: ap
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 6:30 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील अखेरचा सामना हा रविवारी 21 मे रोजी पार पडला. आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर प्लेऑफचे चारही संघ अखेर निश्चित झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आता या 4 संघामध्ये प्लेऑफमध्ये ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. आयपीएल संपताच टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी रवाना होणार आहे. लंडनमध्ये होणाऱ्या महाअंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हे टप्प्याटप्प्याने लंडनला जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये खेळणारे टीम इंडियाचे खेळाडू ज्यांच्या संघांचं गेम ओव्हर झालाय, ते मंगळवारी 23 मे रोजी लंडनला रवाना होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विराट कोहली, आर अश्विन आणि इतर खेळाडूंचा समावेश असणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे टीम इंडियात मोठा बदल हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी होणार आहे.

नक्की बदल काय?

बीसीसीआयने wtc final 2023 आधी टीम इंडियाच्या नव्या किट स्पॉन्सरचं नाव जाहीर केलं आहे. आता जर्मन स्पोर्ट्स ब्रँड आदिदास टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या टीम इंडियाचा किट स्पॉन्सर किलर जीन्स आहे. किलर जीन्सचा टीम इंडियासोबतचा करार हा 31 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून आदिदास टीम इंडियाचा नवा किट स्पॉन्सर असेल. थोडक्यात काय तर टीम इंडियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी हा मोठा बदल होणार आहे.

टीम इंडिया आणि किलर जीन्स यांच्यात किट स्पॉन्सर म्हणून मोठ्या कालावधीसाठी करार झाला होता. किलर आधी एमपीएल (MPL) टीम इंडियाचा किट स्पॉन्सर होता.

बीसीसीआय सचिव यांचं ट्विट

“आम्हाला सांगायला फार आनंद होतोय. बीसीसीआयने अदिदाससह टीम इंडियाचं किट स्पॉन्सर म्हणून करार केला आहे. आम्ही क्रिकेटला पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स वेअर कंपनीसह करार केल्यानं आनंदी आहोत”, असं ट्विट बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केलं आहे.

टीम इंडियाने एमपीएससोबत 2023 पर्यंत किट स्पॉन्सर म्हणून करार केला होता. मात्र एमपीएलकडून मध्येच हा करार मोडण्यात आला. त्यामुळे 5 महिन्यांसाठी बीसीसीआयने किलन जीन्ससह करार केला.

आता बीसीसीआयने आदिदाससह करार केल्याचं तर सांगितलंय. मात्र या किती कोटींचा करार झालाय, याबाबत बीसीसीआयने वाच्छता केलेली नाही. मात्र याआधी एमपीएल बीसीसीआयला किट स्पॉन्सर म्हणून प्रत्येक एका सामन्यासाठी 65 लाख रुपये द्यायची.

महामुकाबला केव्हा?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.