अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आजपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. अफगाणिस्तान टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हशमतुल्लाह शाहीदी याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यात टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ मोठ्या भूमिकेत आहे. जवागल श्रीनाथ हे या सामन्यात सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरी या भूमिकेत आहेत. श्रीनाथ टॉस झाला तेव्हा मैदानात दोन्ही कर्णधारांसह मैदानात होते. सामना नियमांनुसार होतोय की नाही? खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन केलं जातंय का? या आणि अशा अनेक जबाबदाऱ्या या मॅच रेफरीवर असतात.
दरम्यान या मालिकेत बांगलादेशसमोर अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. अफगाणिस्तानने त्यांच्या गेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे बांगलादेशसाठी अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. तसेच दोन्ही संघ हे तोडीसतोड असल्याने दोघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
अफगाणिस्तानने टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
🚨 TOSS ALERT! 🚨
Afghanistan Skipper @Hashmat_50 has won the toss and decided that #AfghanAtalan will bat first in the first ODI against Bangladesh. 👍#AFGvBAN | GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/8wYJEaOG9c
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेलिया खरोटे आणि फजलहक फारूकी.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनझिद हसन, सौम्या सरकार, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.