BAN vs AFG 2nd Odi | गुरुबाज आणि झद्रान यांची शतकी खेळी, बांगलादेशला विजयासाठी 332 धावांचं आव्हान
Bangladesh vs Afghanistan 2nd ODI | अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या रहमानुल्लाह गुरुबाज आणि इब्राहीम इब्राहिम झद्रान या दोघांनी शतकी खेळी केली.
चट्टोग्राम | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने बांगलादेशला विजयासाठी 332 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 331 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान या दोघांनी केलेल्या शतकी खेळीमुळे अफगाणिस्तानला 300 पेक्षा अधिक धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून गुरुबाज याने 125 बॉलमध्ये 13 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 145 धावांची खेळी केली. तर झद्रान याने 119 चेंडूत शतक पूर्ण केलं. झद्रान याने 100 धावांच्या खेळीत 9 फोर आणि 1 खणखणीत सिक्स ठोकला. अफगाणिस्तान कडून या दोघांशिवाय एकालाही मोठी खेळी करता आली नाही.
बांगलादेशला विजयासाठी 332 धावांचं आव्हान
INNINGS BREAK! ?#AfghanAtalan put on an incredible batting performance as they made 331/9 in the 1st inning. @RGurbaz_21 (145) & @IZadran18 (100) scored ?s, making it the 1st instance that both the openers score ?s in ODIs for ??.
Over to our bowlers now!#BANvAFG | #XBull pic.twitter.com/cQ6z166Eie
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 8, 2023
नजीबुल्ला आणि नबी या दोघांनी दुहेरी आकडा गाठला.नजीबुल्ला याने 10 धावे केल्या. मोहम्मद नबी 25 धावांवर नाबाद राहिला. मात्र अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं.
बांगलादेशकडून नजमूल शांतो याचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतली. मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शाकिब अल हसन आणि मेहदी हसन या चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर इबादोत हुसेन याने 1 विकेट घेतली.
अफगाणिस्तानसाठी विक्रमी भागीदारी
दरम्यान गुरुबाज आणि झद्रान या अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने मोठा कारनामा केला. बांगलादेशने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झद्रान आणि गुरुबाज या जोडीने या संधीचा चांगलाच फायद घेतला. या दोघांनी अफगाणिस्तानला एक शानदार आणि धमाकेदार अशी सलामी भागीदारी करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 256 धावांची पार्टनरशीप केली. अफगाणिस्तानसाठी ही विक्रमी एकदिवसीय सलामी भागीदारी ठरली आहे.
या सलामी भागीदारी दरम्यान दोघांनीही आपआपली वैयक्तिक शतक पूर्ण केली. झद्रान याच्या वनडे कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. तर गुरुबाज याने चौथं शतक पूर्ण केलं.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, रशीद खान, फझलहक फारुकी, मुजीब उर रहमान, अजमातुल्ला उमरझाई आणि मोहम्मद सलीम साफी.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | लिटन दास (कर्णधार), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, इबादोत हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान.