AFG vs BAN : बांगलादेशचा दुसऱ्या वनडेत पलटवार, अफगाणिस्तानवर 68 धावांनी मात करत मालिकेत बरोबरी

Afghanistan vs Bangladesh 2nd Odi : बांगलादेशसाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना हा निर्णायक होता. बांगलादेशने या सामन्यात अफगाणिस्तानला लोळवून विजय मिळवला.

AFG vs BAN : बांगलादेशचा दुसऱ्या वनडेत पलटवार, अफगाणिस्तानवर 68 धावांनी मात करत मालिकेत बरोबरी
Image Credit source: bangladesh cricket x account
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 6:00 PM

बांग्लादेश क्रिकेट टीमने 9 नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर पलटवार केला आहे. बांगलादेशने ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तानवर 68 धावांनी मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.  बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजासंमोर अफगाणिस्तानला 185 धावाही करता आल्या नाहीत. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तान टीमला 43.3 ओव्हरमध्ये 184 धावांवर रोखत 68 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना हा रंगतदार आणि चुरशीचा होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

अफगाणिस्तान गुंडाळत बांगलादेशकडून मालिकेत बरोबरी

अफगाणिस्तानसाठी रहमत शाह याने विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रहमतने 76 बॉलमध्ये 5 फोसह 52 धावा केल्या. तर सेदीकुल्लाह अटल याने 51 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. तर गुलाबदीन नईबने 26 रन्स केल्या. मात्र त्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला 20 पेक्षा पुढे जाता आलं नाही.

क्रिकेट चाहत्यांना मोहम्मद नबी आणि राशिद खान या दोघांकडून विजयी खेळीची अपेक्षा होती. मात्र या जोडीने निराशा केली. नबीने 17 आणि राशीदने 14 धावा केल्या. तर कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी अपयशी ठरला. शाहीदीने 17 धावा केल्या. अफगाणिस्तानचे इतर फलंदाजही बांग्लादेशच्या बॉलिंगसमोर ढेर झाले. बांगलादेशकडून नसून अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहमान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर तास्किन अहमद आणि शोरीफूल इस्लाम या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत अफगाणिस्तानला गुंडाळण्यात मदत केली.

बांगलादेशचा विजय आणि मालिका बरोबरीत

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी

बांगलादेश प्लेईंग ईल्व्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, सौम्या सरकार, तौहिद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....