अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि निर्णायक सामना हा शारजाह येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेश अफगाणिस्तानसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तान या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अफगाणिस्तानने 6 नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 92 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत विजयी सलामी दिली. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडे या दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. बांगलादेशला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार, यात शंका नाही.
दरम्यान आता बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्याने ते अफगाणिस्तानसमोर किती धावांचं आव्हान ठेवतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. अफगाणिस्तानचा बॉलिंग अटॅक हा कडक आहे. त्यामुळे बांगलादेशचे फलंदाज अफगाणि गोलंदाजीचा कसा सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकला, सामना जिंकणार का?
🚨 TOSS ALERT! 🚨
Bangladesh have won the toss and decided to bat first against Afghanistan in the 2nd ODI match of the series. #AfghanAtalan | #AFGvBAN | GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/f6i5xMFosD
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 9, 2024
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी
बांगलादेश प्लेईंग ईल्व्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, सौम्या सरकार, तौहिद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.