AFG vs BAN 3rd Odi : महमुदुल्लाह आणि कॅप्टन मिराजची शतकी भागीदारी, अफगाणिस्तानसमोर 245चं आव्हान, कोण जिंकणार मालिका?
Afghanistan vs Bangladesh 3rd ODI 1st Innings Highlights : अनुभवी महमदुल्लाह आणि कॅप्टन मेहदी हसन मिराज या दोघांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला 244 धावांपर्यंत पोहचवलं.
बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तानला तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 245 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 244 धावा केल्या. अनुभवी ऑलराउंडर महमुदुल्लाह आणि कॅप्टन मेहदी हसन मिराज या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशला 240 पार मजल मारता आली. उभयसंघातील ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोण सामन्यासह मालिका जिंकणार? हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
कॅप्टन नजमुल हुसैन शांता याच्या अनुपस्थितीत मेहदी हसन मिराज टॉसला आला. मेहदीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तांझिद हसन आणि सौम्य सरकार या दोघांनी 53 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यांनतर अफगाणिस्तानने बांगलादेशा झटपट 4 झटके दिले. बांगलादेशने 53 धावांवर 2 झटके दिले. सौम्य सरकार 24 आणि ताझिंद हसन याने 19 धावा केल्या. त्यानंतर झाकीर हसन 4 आणि तॉहिद हृदॉय याने 7 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे बांगलादेशची स्थिती 4 बाद 72 अशी झाली. त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि महमुदुल्लाह या दोघांनी डाव सावरला आणि शतकी भागीदारी केली.
मेहदी आणि महमुदुल्लाह या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी केली. अझमतुल्लाह याने ही जोडी फोडली. मेहदी 119 बॉलमध्ये 66 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर झाकेर अली याने 1, नसुम अहमद याने 5 धावा केल्या. तर महमुदुल्लाह नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. महमुदुल्लाह याने 98 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 98 रन्स केल्या. तर अझमतुल्लाह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद नबी आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशच्या 244 धावा
Mahmudullah and Mehidy Hasan Miraz shoulder Bangladesh past 200 against Afghanistan in the ODI series decider 🏏
📝 #AFGvBAN: https://t.co/Bt1r2JClif | 📸: @ACBofficials pic.twitter.com/oev8dl36ua
— ICC (@ICC) November 11, 2024
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबादिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी.
बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन : मेहदी हसन मिराझ (कॅप्टन), तन्झिद हसन, सौम्या सरकार, झाकीर हसन, तौहिद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, नाहिद राणा, शॉरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.