AFG vs PAK 2nd Odi | अफगाणिस्तानने शेवटपर्यंत रडवलं, पण पाकिस्तानचा 1 विकेटने सनसनाटी विजय, मालिका जिंकली

afghanistan vs pakistan 2nd odi | पाकिस्तानने अफगाणिस्तानवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 1 विकेटने विजय मिळवला.

AFG vs PAK 2nd Odi | अफगाणिस्तानने शेवटपर्यंत रडवलं, पण पाकिस्तानचा 1 विकेटने सनसनाटी विजय, मालिका जिंकली
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 11:40 PM

हंबटटोटा | पाकिस्तान क्रिकेट टीमने 1 बॉल राखून दुसरा वनडे सामना हा 1 विकेटने जिंकला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला विजयासाठी 301 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानने या आव्हानाचा शानदार पाठलाग केला. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. त्यामुळे थरार आणखी रंगला. क्रिकेट चाहत्यांची उत्सूकता आणखी शिगेला पोहचली. पाकिस्तान दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकते की अफगाणिस्तान बरोबरी करते, याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र पाकिस्तानने बाजी मारली. पाकिस्तानने 301 धावांचं लक्ष्य हे 49.5 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानने यासह 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

पाकिस्तानने मालिका जिंकली

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तानची बॅटिंग

त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज याने बॅटिंगने तोडफोड केली. रहमानुल्लाह याने सर्वाधिक 151 धावांची खेळी केली. इब्राहिम झद्रान याने 80 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद नबी याने 29 धावा केल्या. तर कॅप्टन हशमतुल्ला शाहिदी याने नाबाद 15 धावांचं योगदान दिलं.

अब्दुल रहमान याने नॉट आऊट 4 रन्स केल्या. राशिद खान 2 धावांवर आऊट झाला. तर शाहीदुल्ला कमाल 1 धावेवर रनआऊट झाला. पाकिस्तानकडून शाहिन अफ्रिदी याने 2 विकेट्स घेतल्या. तर उस्मा मीर आणि नशीम शाह या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि शाहीदुल्ला कमाल.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.