AFG vs SA : 10 चौकार 3 षटकार, रहमानुल्लाह गुरुबाझ याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक शतक
Rahmanullah Gurbaz Century : रहमानुल्लाह गुरुबाज याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याच्या बॉलिंगवर चौकार ठोकत शानदार शतक ठोकलं. रहमानुल्लाहने यासह इतिहास रचला आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा युवा फलंदाज रहमानुल्लाह गुरुबाझ याने ऐतिहासिक शतक ठोकलं आहे. रहमानुल्लाह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करणारा पहिला अफगााणि फलंदाज ठरला आहे. रहमानुल्लाहच्या या शतकी खेळीमुळे अफगाणिस्तान उत्तम स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानकडे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 300 पेक्षा अधिक धावांचा आव्हान ठेवण्याची संधी आहे.
अफगाणिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. रहमानुल्लाह आणि रियाझ हसन या सलामी जोडीने टीमला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 88 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर रियाझ हसनने 45 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 29 रन्स केल्या. त्यानंतर रहमानुल्लाहने रहमत शाह या जोडीने भागीदारी करत स्कोअरकार्ड हलता ठेवला. या दरम्यान रहमानुल्लाह यान 34 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. रहमानुल्लाहने 107 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 96.26 च्या स्ट्राईक रेटने 103 धावा केल्या. रहमानुल्लाहच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे सातवं शतक ठरलं.
रहमानुल्लाहला शतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्याची संधी होती. मात्र रहमानुल्लाहला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. रहमानुल्लाह अवघ्या 2 धावा केल्यानंतर आऊट झाला. रहमानुल्लाहला नांद्रेस बर्गर याने क्लिन बोल्ड केलं. रहमानुल्लाहने 110 बॉलमध्ये 3 10 चौकार आणि 3 षटकारांसह 95.45 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. रहमानुल्लाहने या शतकी खेळीसह मागील फलंदाजांसाठी अनुकूल स्थिती तयार केली आहे. आता अफगाणिस्तानचे फलंदाज या संधीचा किती फायदा घेतात याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
रहमानुल्लाह गुरुबाज याचं ऐतिहासिक शतक
𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃!!! 💯@RGurbaz_21 puts on a terrific batting performance and brings up his 7th ODI century to become the first Afghan batter to achieve this feat in the format. 🤩
Incredible knock, Gurbaz! 👏#AfghanAtalan | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/vRT3Rr8uEc
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 20, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, ब्योर्न फोर्टुइन, नांद्रे बर्गर, नकाबा पीटर आणि लुंगी एन्गिडी
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रियाझ हसन, रहमत शाह, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी.