SA vs AFG: कॅप्टन राशिद सेमी फायनलमधील पराभवानंतर भावूक, म्हणाला, “आम्ही कायम…”
South Africa vs Afghanistan Rashid Khan: अफगाणिस्तानचा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील प्रवास हा सेमी फायनलमध्ये येऊन थांबला. या पराभवानंतर राशिद खान काय म्हणाला?
राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमचं टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 9 विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवत चोकर्स हा शिक्का पुसून काढला. अफगाणिस्तानने या स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघांचा धुव्वा उडवला. त्यानंतर सुपर मधील अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशच्या पराभवासह ऑस्ट्रेलियाचा बाजार उठवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मात्र फ्लॉप बॅटिंगमुळे अफगाणिस्तानचा प्रवास सेमी फायनलमध्येच संपला. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटोंसह पोस्ट केली आहे. राशिदने क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.
राशिद खानची भावूक पोस्ट
अफगाणिस्तानचा पराभवासह प्रवास संपल्याने राशिद भावूक दिसून आला. राशिदने ही भावूकता आपल्या सोशल मीडियातूनही दाखवून दिली. राशिदने सोशल मीडिया पोस्टमधून धन्यवाद म्हटलं. “आम्ही हा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा कायम लक्षात ठेवू. या टीममधील प्रत्येक खेळाडूने संघर्ष केला तो उल्लेखनीय आहे. मला आमच्या सर्वांवर गर्व आहे. आम्ही इथून पुढे जाणं सुरुच ठेवणार आहोत. आम्ही पुढील सामन्यातून जोरात पुनरागमन करु. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर आणि या प्रवासात आमची मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार”, असं राशिदने म्हटलं.
दरम्यान अफगाणिस्तानची ढिसाळ बॅटिंग ही त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. राशिदने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेनेने अफगाणिस्तानला 56 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे आफ्रिकेला मिळालेलं 57 धावांचं माफक आव्हान हे त्यांनी 1 विके्टस गमावून सहज पूर्ण केलं. आफ्रिका अशाप्रकारे अखेर वर्ल्ड कप स्पर्धेत आठव्या प्रयत्नात पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरली. दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीत टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध सामा होणार आहे.
राशिद खान काय म्हणाला?
We will always remember this #T20WorldCup !
The fight put ahead by each and every one of this team is commendable and I’m really proud of all of us! 🇦🇫
We will continue to build from here and comeback with more grit in the next one 💪
Thank you to each and everyone who… pic.twitter.com/MbzdTSlROR
— Rashid Khan (@rashidkhan_19) June 27, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.