AFG vs SL | Mohammad Nabi याचा तडाखा, श्रीलंका विरुद्ध वादळी अर्धशतक
Mohammad Nabi Asia Cup 2023 Afghanistan vs Sri Lanka | मोहम्मद नबी याने श्रीलंका विरुद्धच्या करो या मरो सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकत मोठा रेकॉर्ड केला आहे.
लाहोर | आशिया कप 2023 मधील सहाव्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. श्रीलंकाने या सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलंय. मात्र अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी 292 धावांचं आव्हान हे 37.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये पोहचले आहेत. तर बी ग्रुपमधून बांगलादेश पोहचली आहे. त्यामुळे बी ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी एका जागेसाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात चढाओढ सुरु आहे. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि बॅट्समन मोहम्मद नबी याने वादळी अर्धशतक ठोकलंय.
मोहम्मद नबी याने अवघ्या 24 बॉलमध्ये चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. नबी याच्या वनडे करियरमधील हे 16 वं अर्धशतक ठोकलं. नबीने यासह मोठा रेकॉर्ड केला. नबी अफगाणिस्तानकडून वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. नबीने मुजीब उर रहमान याचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढलाय. सुपर 4 साठी 37.1 ओव्हरमध्ये 292 धावांची गरज असल्याने नबीने मैदानात येताच आक्रमक पद्धतीने खेळी केली.
पाचव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी
नबीने अर्धशतकादरम्यान चौफेर फटकेबाजी केली. नबीने अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकला. मात्र या नादात तो आऊट झाला. अफगाणिस्तानला 26.3 ओव्हरमध्ये मोहम्मद नबीच्या रुपात पाचवा झटका लागला. मोहम्मद नबी याने 203.12 च्या स्ट्राईक रेटने 5 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 32 बॉलमध्ये 65 धावांची वादळी खेळी केली. नबी आणि हशमतुल्लाह शाहिदी या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 80 धावांची भागीदारी केली.
अफगाणिस्तानसाठी वेगवान एकदिवसीय अर्धशतक
मोहम्मद नबी (24 बॉल) विरुद्ध श्रीलंका.
मुजीब उर रहमान (26 बॉल) विरुद्ध पाकिस्तान.
राशिद खान (27 बॉल) विरुद्ध आयर्लंड.
मोहम्मद नबी याचा कीर्तीमान
FIFTY for the President! 👏
The President @MohammadNabi007 is on a roll as he brings up an electrifying half-century against Sri Lanka. This has been an extra-ordinary inning so far! 🤩#AfghanAtalan | #AsiaCup2023 | #AFGvSL | #SuperCola | #WakhtDyDaBarya pic.twitter.com/r2Hzf0X1Bn
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 5, 2023
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.