लाहोर | श्रीलंका क्रिकेट टीमने अफगाणिस्तानला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 291 धावा केल्या. त्यामुळे आता अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी नेट रनच्या हिशोबाने 292 धावांचं आव्हान हे 40 ओव्हरआधी पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान या प्रयत्नात यशस्वी ठरतं की श्रीलंका त्यांना रोखतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण या सामन्याच्या निकालानंतर सुपर 4 मधील चारही संघ निश्चित होतील.
ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडियाने सुपर 4 साठी क्वालिफाय केलंय. तर बी ग्रुपमधून बांगलादेशने सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. त्यामुळे बी ग्रुपमधून सुपर 4 साठी जागा 1 आणि दावेदार 2 आहेत. या जागेसाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कडवी झुंज आहे. त्यामुळे आता या सामन्यात सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र सुपर 4 मध्ये पोहचायचं असेल तर अफगाणिस्तानला 292 धावांचं आव्हान हे 37.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अफगाणिस्तानकडे सुपर 4 साठी 37.1 ओव्हर
Afghanistan need to chase down the total under 37.1 overs to qualify for the Super 4s! #AsiaCup2023 #AFGvSL
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 5, 2023
अफगाणिस्तानला 292 रन्सचं टार्गेट
🇱🇰 Post 291 on the board! 🔥
Kusal Mendis leads the charge with 92 runs. Time to defend the target #LankanLions! #AsiaCup2023 #SLvAFG pic.twitter.com/Ywt51mkKJF— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 5, 2023
श्रीलंकेकडून कुसल मेंडीस याने सर्वाधिक 84 बॉलमध्ये 92 धावा केल्या. पाथुम निसांका याने 41, दिमुथ करुणारत्ने याने 32, समरविक्रमा याने 3, असलंका 36, धनंजय डी सीलिव्हा 14 आणि कॅप्टन दासून शनाका याने 5 धावा केल्या. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये दुनिथ वेललागे आणि महेश थेक्षणा या दोघांनी शानदार फिनीशिंग टच दिला. दुनिथ याने 33 आणि थेक्षाणा याने नाबाद 28 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नईब याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राशिद खान याने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर मुजीब उर रहमान याच्या खात्यात 1 विकेट गेली.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.