IPL : ‘पोट कमी करून 20 किलो वजनही कमी कर, सीएसकेमधून खेळवतो’; महेंद्र सिंह धोनीची खेळाडूला ऑफर
IPL 2024 : आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीला फक्त मैदानावर खेळताना पाहणसुद्धा चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. धोनीने अनेक युवा खेळाडूंना स्टार केलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, दीपक चहर अनेक नावं आहेत, जाणून घ्या धोनीने कोणत्या खेळाडूला ऑफर केली होती.
मुंबई : आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनी कधीपर्यंत खेळणार? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना पडत असावा. 2019 पासून धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र धोनी 2024 ची आयपीएलही खेळणार असून चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबादारी त्याच्याकडे आहे. येत्या 19 तारखेला आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार आहे. सीएसके टीम मॅनेजनमेंट कोणत्या खेळाडूंना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र धोनीने एका खेळाडूला संघात घेण्यासाठी पोट कमी दिल्याचं ऑफर दिल्याचं अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाणचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
धोनीने कोणाला दिली ऑफर?
अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाण याने एक मुलाखतीमध्ये बोलताना धोनीने दिलेल्या ऑफरची आठवण सांगितली. 2018 च्या आशिया कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तानमधील सामना टाय झाला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टीम इंडियाला 253 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 252 वरच ऑल आऊट झालेली. या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद शहजाद याने 124 धावांची खेळी केली होती.
या सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार अफगाण धोनीला बोलला की, सामना टाय झाल्यावर धोनीसोबत बोलताना, मोहम्मद शहजाद हा तुझा फॅन आहे. यावेळी धोनी, शहजाद याने त्याचं पोट कमी करत आणि 20 किलो वजन घटवलं तर त्याला सीएसकेमध्ये बॅट्समन म्हणून संघात घेईल, असं मिश्किलपणे म्हणाला.
दरम्यान, धोनीच्या ऑफरनंतर अफगाणिस्तानच्या ज्या खेळाडूला धोनीने ऑफर दिलेली, त्याचं वजन 5 किलोने वाढल्याचं असगर अफगाणने सांगितलं. या मुलाखतीमध्ये बोलताना असगर अफगाण म्हणाला की, टीम इंडियासोबत झालेला टाय सामना माझ्यासाठी मोठा क्षण आणि सर्वोत्तम सामना असल्याचं मोहम्मद शहजादने म्हटलं आहे.