World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानने इंग्लंडला लोळवल्यानंतर पॉईंट टेबलमध्येही मोठा उलटफेर, कांगारूंना 440 व्होल्ट्सचा झटका
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप विजेत्या इग्लंड संघाला पराभूत करत मोठा उलटफेर केलाय. या विजयानंतर पॉईंट टेबलमध्येही अफगाणिस्तान संघाने मोठी झेप घेतली आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील आजच्या सामन्यात मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला आहे. इग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाने 69 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या खेळाडूने गुडघे टेकले. गतविजेता इंग्लंडचा संघ 250 धावांपर्यंत पोहोचला नाही. या विजयासह पॉईंट टेबलमध्येही मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तान संघाने पॉईंट टेबलमध्ये भरारी घेतली आहे.
पॉईंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानी कायम आहे. आजच्या विजयाने अफगाणिस्तान संघ तळाला होता मात्र आजच्या विजयासह अफगाणिस्तानने सहाव्या स्थानी आला आहे. अफगाणिस्तान संघाने तीन पैकी दोन सामने गमावले असून आजच्या सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवला आहे. तर दुसरी इंग्लंड संघानेही तीन पैकी दोन सामने गमावले असून एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
सामन्याचा धावता आढावा
अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघासमोर 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाज याने सर्वाधिक 80 धावा तर इक्रम अलीखिल याने 58 धावा केल्या होत्या. इंंग्लंडचा आदिल रशिद याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचा डाव 215 धावांवर ऑल आऊट झाला. मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत इंग्लंडचा अर्धा संघ गुंडाळला होता.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.