AUS vs AFG | राशिद खानची तोडफोड बॅटिंग, कांगारुंसमोर 292 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Australia vs Afghanistan | मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अफगाण्यांनी करामत केली आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 292 धावांचं आव्हान ठेवलंय. त्यामुळे कांगारुंना विजयासाठी वर्ल्ड कपमधील सर्वाचं मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे.

AUS vs AFG | राशिद खानची तोडफोड बॅटिंग, कांगारुंसमोर 292 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 6:24 PM

मुंबई | इब्राहीम झद्रान याचं शतक आणि राशिद खान याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं अवघड असं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 291 धावा केल्या. ओपनिंगला आलेला इब्राहीम झद्रान हा अखेपर्यंत नाबाद राहिला. तर राशिद खान याने अखेरीस येऊन निर्णयक क्षणी जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडून काढला.  राशिद खान याने केलेल्या खेळीमुळे अफगाणिस्तानला 290 पार मजल मारता आली.

अफगाणिस्तानकडून इब्राहीमने 143 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 129 धावांची शतकी आणि ऐतिहासिक खेळी केली. इब्राहीम अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. राशिद खान याने अखेरच्या काही षटकांमध्ये जोरदार बॅटिंग करुन चौफेर फटकेबाजी केली. राशिदने 18 बॉलमध्ये 2 चौकार 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावांचं योगदान दिलं. राशिदने इब्राहीमला चांगली साथ दिली. त्यामुळेच अफगाणिनस्तानला मोठी धावसंख्या गाठता आली.

अफगाणिस्तानकडून इब्राहीम आणि राशिद या दोघांव्यतिरिक्त इतरांनीही चांगलं योगदान दिलं. रहमानुल्लाग गुरुबाज याने 21 धावांचं योगदान दिलं. रहमत शाह याने 30 धावा जोडल्या. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 26 रन्स केल्या. अझमतुल्लाह 22 धावा करुन आऊट झाला. तर मोहम्मद नबी याने टॉप गिअर टाकत फटकेबाजी केली. मात्र तो 12 धावांवर कॅच आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियासमोर 292 रन्सचं टार्गेट

दरम्यान ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 287 धावांचं यशस्वी चेजिंग केलीय. ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी 27 वर्षांपूर्वी 1996 साली न्यूझीलंड विरुद्ध केली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्तानच्या फिरकी माऱ्यासमोर 292 धावा करणं आव्हानात्मक ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.