अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या कोण मिळवून देतील पॉइंट्स

वनवेड वर्ल्डकप स्पर्धेतील 30वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, या सामन्यात दोन्ही संघातील महत्त्वाच्या खेळाडूंवर नजर असेल.

अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या कोण मिळवून देतील पॉइंट्स
अफगाणिस्तान आणि श्रीलंका सामन्यात हे 11 खेळाडू खोलतील नशिबाचं दार, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 7:41 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातील दोन्ही संघांची उपांत्य फेरीची वाट स्पष्ट करणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. जिंकणाऱ्या संघाचे एकूण 6 गुण होतील आणि उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. तर पराभूत झालेल्या संघांचं वाटचाल कठीण होईल. अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या दिग्गज संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे श्रीलंकेला अफगाणिस्तानचा पेपर कठीण असेल यात शंका नाही. श्रीलंकेचा नेट रनरेट चांगला असल्याने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तानचा संघ सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघातील 11 खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. असं असलं तरी मागची आकडेवारी पाहता निवड करता येईल.

श्रीलंकेकडून निसांका आणि कुसल मेंडिस आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. तर अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज आणि जादरान यांनीही आपल्या छाप सोडली आहे. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना संभ्रम तर असणारच आहे. कर्णधार म्हणून कुसल मेंडिस हा प्रमुख दावेदार ठरू शकतो. कारण आक्रमक फलंदाजी पाहता पॉइंट्सचं गणित सुटू शकतं. त्याचबरोबर अँजोलो मॅथ्यूज हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. तर गुरबाज हा देखील मोठा उलटफेर करू शकतो.

पिच रिपोर्ट

श्रीलंक आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदान पूरक असल्याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहे. कौल आपल्या बाजूने लागल्यास कर्णधार गोलंदाजी करणं पसंत करेल.

ड्रीम इलेव्हन 1

विकेटकीपर: कुसल मेंडिस (कर्णधार) इब्राहिम अलीखिल फलंदाज: रहमानुल्लाह गुरबाज (उपकर्णधार), पथुम निसांका, इब्राहिम जादरान ऑलराउंडर्स: अँजेलो मॅथ्यूज, दुनिथ वेल्लालागे, राशिद खान गोलंदाज: दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका फजल हक फारूकी

ड्रीम इलेव्हन 2

विकेटकीपर: कुसल मेंडिस इब्राहिम अलीखिल फलंदाज: सदीरा समरविक्रमा, हश्मतुल्लाह शाहिदी, कुसल परेरा ऑलराउंडर्स: अँजेलो मैथ्यूज (कर्णधार), राशिद खान, धनंजय डी सिल्वा गोलंदाज: दुष्मंथा चमीरा, मुजीब उर रहमान, कसुन रजिता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

श्रीलंका: पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/ विकेटकीपर) सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षणा, कसुन रजिता, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका.

अफगानिस्तान: रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, इकराम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.