हार्दिकसोबत काडीमोड झाल्यानंतर नताशाने उचललं असं पाऊल, कृणाल पांड्याची अशी होती प्रतिक्रिया
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक ही जोडी गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. घटस्फोट झाल्यानंतरही या दोघांबाबत काही ना काही चर्चा होत असते. आता नताशा स्टॅन्कोविकने घटस्फोटानंतर पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या 4 वर्षांपासून तिने या क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. आता ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक या जोडीचे लाखो चाहते आहेत. या दोघांनी काडीमोड घेतल्यापासून दोन्ही चाहत्यांमध्ये या ना त्या कारणाने आमनासामना होत असतो. पण नताशाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण हार्दिक पांड्या क्रिकेटविश्वात पुन्हा मग्न झाल्यानंतर नताशा काय करणार? असा प्रश्न होता. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. मागच्या चार वर्षांपासून नताशाने अभिनयाकडे पाठ फिरवली होती. मात्र पुन्हा एकदा ती आपल्या जुन्या रंगात दिसून आली आहे. नताशा स्टॅन्कोविकचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. या व्हिडीओत ती पंजाबी गायक प्रीतिंदरसोबत दिसत आहे. नताशा बऱ्याच कालावधीनंतर टीव्ही स्क्रिनवर झळकली आहे. इतकंच काय तर नताशाचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या व्हिडीओत तिचं नृत्यही चाहत्यांना भावलं आहे. नताशाने हा व्हिडीओ स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हार्दिकसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी नताशा म्युझिक व्हिडीओ आणि रिअलिटी शोमध्ये काम करत होती. त्याचबरोबर मॉडलिंगही करत होती. पण हार्दिकशी लग्न केल्यानंतर तिने या क्षेत्रापासून लांब राहणं पसंत केलं होतं. पण हार्दिकशी काडीमोड झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला आहे. चार वर्षात इंस्टाग्रामवर इंफ्लूएन्सर म्हणून छाप पाडली. तसेच युट्यूब चॅनेलवरही काम केलं होतं. पण अभिनयापासून दूर होती. आता तिला रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. असं असताना हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याने तिचा नवा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया नोंदवली आहे. कृणाल पांड्याने या व्हिडीओ पोस्टवर हृदय असलेला इमोजी शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘डिजेवाले बाबू’ या गाण्यामुळे नताशा स्टॅन्कोविक चर्चेत आली होती. तिच्या कारकिर्दितील हे सर्वात हिट गाणं होतं. त्यानंतर एक्स बॉयफ्रेंड असलेल्या अली गोनीसोबत रिएलिटी शो नच बलिएमध्ये दिसली होती. पण त्यानंतर हार्दिक आणि नताशाचं सूत जुळलं आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2019 च्या शेवटी हार्दिकने नताशासोबत एक फोटो शेअर करत आपल्या नात्याबाबत अधिकृतरित्या सांगितलं. दोघांनी करोना काळात लनग्न केलं आणि 2020 मध्ये आई वडील झाले. 2020 मध्ये नताशाने अगस्त्यला जन्म दिला. मात्र लग्नाच्या चार वर्षातच दोघं वेगळे झाले आणि घटस्फोट घेतला.