IND vs PAK : हरल्यानंतरही पाकिस्तानच्या चाहत्याचा विश्वास, ‘मारो मुझे मारो’वाल्या मोमिन नेमकं काय बोलला, जाणून घ्या…
काल तुम्ही पाकिस्तानला त्यांच्याच एका महिला पत्रकाराकडून मिळालेला घरचा आहेर पाहिलाय. त्यानंतर सोशल मीडियावर सरफराज देखील चिडला. त्यात आता 'मारो मुझे मारो'वाला मोमिन देखील चर्चेत आलाय.
नवी दिल्ली : आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान संघ (IND vs PAK) हरल्यानंतर त्यांच्या मनात आधीच सोशल मीडिया (Social Media) आणि टीम इंडियाच्या चाहत्यांविरोधात रोष आहे. तो वारंवार दिसूनही येतोय. आता त्यात नवीन किस्सा समोर आलाय. काल तुम्ही पाकिस्तानला त्यांच्याच एका महिला पत्रकाराकडून मिळालेला घरचा आहेर पाहिलाय. पाकिस्तानच्या क्रिकेट संघावरच या महिला पत्रकारानं बोट ठेवलं. त्यानंतर सोशल मीडियावर सरफराज देखील चिडला. त्यात आता ‘मारो मुझे मारो’वाला मोमिन देखील चर्चेत आला आहे. या मोमिनचा आत्मविश्वास त्याच्या आणि विराटच्या (Virat Kohali) भेटीदरम्यान दिसून आला. हा मोमिन जे काही म्हणाला त्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.
मोमिन काय म्हणाला?
भारतानं आशिया चषकामध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजयी सुरुवात केली. या सामन्याचा हिरो हार्दिक पांड्या ठरला. त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तसेच 3 बळी घेतले. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर विराट कोहली आणि पांड्याला भेटण्यासाठी खास व्यक्ती पोहोचली. कोहलीला त्यानं फायनलमध्ये भेटू, असंही म्हटलं. मॅचनंतर कोहली आणि हार्दिक पांड्याला भेटलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून मारो मुझे मारो फेम मोमिन साकिब होता.
मोमिन साकिबची इन्स्टा पोस्ट
View this post on Instagram
मोमिन कोण आहे?
2019 च्या विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर साकिब सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. पाकिस्तानच्या पराभवामुळे निराश झालेल्या त्याने मित्रांना कॅमेरासमोर मारण्यास सांगितले. साकिबच्या या व्हिडीओची जगभरात चांगलीच चर्चा झाली होती. तो दृष्टीक्षेपातच सोशल मीडियाचा स्टार बनला होता. सध्या तो दुबईत असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना पाहण्यासाठी तो आला होता. पाकिस्तान संघाची कामगिरी पाहून तो निराश झाला. सामना संपल्यानंतर त्याने कोहली आणि पंड्या यांचीही भेट घेतली आणि विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. साकिबने आशा व्यक्त केली आहे की दोन्ही संघ आशिया चषक 2022 च्या विजेतेपदाचा सामना खेळतील.
सामन्यात काय झालं?
पंड्या आणि रवींद्र जडेजाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला. यासह भारताने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात 10 विकेट्स गमावण्याची बरोबरी केली. या सामन्यात कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या. व्हिडिओ शेअर करताना साकिबने लिहिले की, एक हुशार खेळाडू आणि नम्र व्यक्तिमत्त्व. तुम्हाला परत फॉर्ममध्ये पाहून आनंद झाला. किती छान सामना होता तो. फायनलमध्ये भेटू. कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये झुंजत आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर तो या सामन्यातून मैदानात परतला. इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती.