बंगळुरु : कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमला 21 धावांनी हरवलं. या मॅचमध्ये विराट कोहली बँगलोरच नेतृत्व करत होता. या पराभवानंतर विराट कोहली चांगलाच खवळला. विराटला पराभव सहन झाला नाही, आम्ही हरण्याच्याच लायकीचे आहोत असं त्याने म्हटलं. केकेआरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 200 धावा केल्या.
प्रत्येक आघाडीवर केकेआरची टीम आरसीबीपेक्षा एक पाऊल पुढे होती. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर नितीश राणाची टीम आरसीबीवर भारी पडली. 201 धावांच्या लक्ष्यााच पाठलाग करताना बँगलोरने 8 विकेट गमावून 179 धावा केल्या. बँगलोरची गोलंदाजी आधी फ्लॉप ठरली, त्यानंतर बॅटिंग.
टीमवर आगपाखड करताना विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहलीने आरसीबीकडून सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही. आरसीबीचा हा चौथा पराभव आहे. आम्ही स्वत:चा कोलकाता हा सामना दिला, असं विराट पराभवानंतर बोलताना म्हणाला. “आम्ही हरण्याच्या लायकीचा खेळ केला. आम्ही प्रोफेशनल खेळलो नाही. गोलंदाजी चांगली केली. पण फिल्डिंगचा स्तर चांगला नव्हता. आम्ही 2 कॅच सोडल्या. त्यामुळे 25 ते 30 रन्स अतिरिक्त मोजावे लागले” असं विराट कोहलीने सांगितलं.
Virat Kohli said, “we deserved to lose tonight, we weren’t professional tonight in the field”. pic.twitter.com/hxPqjLl0Cd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 26, 2023
फलंदाजीत काय चुकलं?
विराट कोहली फलंदाजीबद्दल सुद्धा बोलला. “सगळं चांगलं सेट केलं होतं. पण 4-5 विकेट पडल्या. आम्ही ज्या चेंडूवर विकेट गमावले, ते बाद होणारे चेंडू नव्हते. पण बॅट्समननी थेट फिल्डर्सकडे शॉट मारले” असं विराट म्हणाला.
RCB चे मोठे प्लेयर फ्लॉप
सामन्याबद्दल बोलायच झाल्यास, कोलकाताकडून जेसन रॉयने सर्वाधिक 56, नितीश राणा 48 आणि वेंकटेश अय्यरने 31 धावा फटकावल्या. सुयश शर्मा, आंद्रे रसेलने प्रत्येकी 2-2 विकेट आणि वरुण चक्रवर्तीने 3 विकेट घेतल्या. फाफ डु प्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल हे मोठे खेळाडू फ्लॉप ठरले.