IND vs AUS Test : KL Rahul ला टि्वटरवर बेकार धुतलय, तुम्ही पोटधरुन हसाल, VIDEO

| Updated on: Feb 19, 2023 | 1:42 PM

IND vs AUS Test : केएल राहुलच्या दुसऱ्या टेस्टमधील खराब कामगिरीनंतर नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर आलाय. त्यांनी खूप गमतीशीर पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहिल्यानतंर तुम्ही पोटधरुन खळखळून हसाल.

IND vs AUS Test : KL Rahul ला टि्वटरवर बेकार धुतलय, तुम्ही पोटधरुन हसाल, VIDEO
kl rahul
Follow us on

IND vs AUS 2nd Test : दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाने फॅन्सच मन जिंकलं. पण एक प्लेयर स्वत:च्या कामगिरीवर अजिबात खूश नसेल. या खेळाडूच नाव आहे, केएल राहुल. खराब फॉर्मचा सामना करणारा केएल राहुल दिल्ली कसोटीच्या दोन्ही इनिंगमध्ये फ्लॉप ठरला. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 17 धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता. मात्र तो फक्त 1 रन्स काढून आऊट झाला. टेस्ट क्रिकेटच्या 10 इनिंगमध्ये तो एकदाही 25 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

केएल राहुलने किती धावा केल्या?

मागच्या 10 इनिंगमध्ये केएल राहुलने फक्त 125 धावा केल्या आहेत. यात त्याचा बेस्ट स्कोर 23 रन्स आहे. दिग्गज माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी केएल राहुल विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. त्याने एकाचवेळी अनेक टि्वट करुन केएल राहुलच्या कामगिरीवर टीका केलीय. राहुलमुळे अनेक चांगले प्लेयर्स बेंचवर बसल्याच प्रसाद यांनी सांगितलं.


केएल राहुलला खेळवणं मॅनेजमेंटचा हट्ट

केएल राहुलचा धावांचा दुष्काळ संपलेला नाही. याचा संबंध मॅनेजमेंटच्या हट्टाशी आहे. ते अशा खेळाडूला खेळवतायत, जो टीमचा भाग वाटत नाही, असं वेंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. मागच्या 20 वर्षात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या कुठलाही बॅट्समनची इतकी खराब सरासरी नाहीय.

केएल राहुलच्या दुसऱ्या टेस्टमधील खराब कामगिरीनंतर नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर आलाय. त्यांनी खूप गमतीशीर पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहिल्यानतंर तुम्ही पोटधरुन खळखळून हसाल.