वनडे मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माकडून खेळाडूंची कानउघडणी, म्हणाला…
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया खडबडून जागी झाली आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एका अर्थाने लिटमस टेस्ट झाली. अवघ्या सहा महिन्यात भारताला सुधारणा करायच्या आहेत. तसेच आता फक्त तीन वनडे सामने असणार आहेत.
गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड पाहता टीम इंडिया वनडे मालिका सहज जिंकेल असा विश्वास होता. मात्र घडलं काही भलतंच..तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. दिग्गज खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरली होती. पण श्रीलंकेने भारताला 2-0 ने धोबीपछाड दिला. 1997 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत झाला. ही मालिका गमवल्याने बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूपच तयारी करवी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात पहिली आयसीसी स्पर्धा असणार आहे. अशात श्रीलंका दौऱ्यात झालेल्या चुकांकडे बारीक लक्ष द्यावं लागणार आहे. मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा संतापला होता. आता त्याने देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व खेळाडूंना पटवून दिलं आहे. ” जे खेळाडू उपलब्ध असतील त्यांनी रणजी ट्रॉफी खेळावी असं आमचं कायमच सांगण आहे. देशांतर्गत क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कणा आहे. अनेक खेळाडू आता देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. यासाठी आमच्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचं खूप महत्त्व आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
“आम्हाला आयपीएल नाही तर देशांतर्गत स्पर्धांमधून खेळाडू मिळतात. जेव्हा तुमची कसोटी आणि वनडे क्रिकेटसाठी निवड होते तेव्हा त्याची खूप चर्चा होते. कोणी रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. “, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. ‘आयपीएल ही आपल्या देशाची स्पर्ध आहे. भारतासाठी निवड होण्यासाठी देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करणं महत्त्वाचं आहे. आयपीएल एक अशी स्पर्धा जिथे वेगळी आव्हानं आहेत. म्हणूनच आयपीएल, रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अलीसारख्या स्पर्धेत चांगलं करेल त्यालाच निवडलं जाईल.’, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
दरम्यान, बीसीसीआयच्या आक्रमक पवित्र्यामुळे खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. इशान किशन झारखंडमधून क्रिकेट खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून परतल्यानंतर इशान किशन देशांतर्गत क्रिकेट खेळला नव्हता. तसेच थेट आयपीएलमध्ये उतरला होता. त्यामुळे सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळण्यात आलं. तसेच भारतीय संघात तेव्हापासून निवडही झाली नाही.