मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (South Africa T 20 Series) निवड झाली नाही, तेव्हा निदान आयर्लंड विरुद्ध संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आयर्लंड सीरीजसाठी (Ireland T 20 series) सुद्धा संघ निवडला आणि त्यामध्ये ही निवड झाली नाही, त्यावेळी Rahul tewatia ला स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठी निवड झाली नाही, ही गोष्ट राहुल तेवतियाच्या मनाला खूप लागली. त्याच्यासाठी तो एक धक्का आहे. आपली निवड झाली नाही, हे जेव्हा राहुलला कळलं, त्यावेळी त्याच्या मनात जे आलं, ते त्याने बोलून दाखवलं. त्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार शोधला. एका टॅलेंटेड खेळाडू बरोबर जेव्हा असं होतं, तेव्हा खरोखर वाईट वाटतं. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी 17 खेळाडूंची टीम निवडण्यात आली आहे. यात युवा खेळाडूंची फौज आहे. पण त्यात राहुल तेवतियाचं नाव नाहीय. एक चांगली बाब म्हणजे राहुल त्रिपाठीला संधी मिळालीय. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांनी सुद्धा पुनरागमन केलय. आयर्लंड सीरीजसाठी कॅप्टनशिपची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे.
आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. आपल्या फलंदाजीच्या बळावर त्याने गुजरातला अनेकदा अडचणीतून बाहेर काढलं. अशक्य वाटणारे सामने जिंकून दिले. शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना, राहुल तेवतियाने सलग दोन षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. मागच्या सीजनमध्येही राहुल त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आला होता. या सीजनमध्येही त्याने लौकीकाला साजेशी कामिगरी केली.
Expectations hurts ??
— Rahul Tewatia (@rahultewatia02) June 15, 2022
फिनिशरचा रोल तो उत्तम निभावू शकतो. अशा खेळाडूकडे बीसीसीआयच्या निवड समितीने दुर्लक्ष केलं. त्याने 16 सामन्यात 217 धावा केल्या. या धावा तुम्हाला कमी वाटतील, पण राहुल तेवतिया अखेरच्या षटकांमध्ये सामना अटी-तटीचा असताना, फलंदाजीला यायचा. तो आणि डेविड मिलर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे संकटमोचक ठरले होते. राहुलने काल आयर्लंड विरुद्ध टीमची निवड झाल्यानंतर Expectations hurts म्हणजे अपेक्षांना धक्का एवढेच दोन शब्द टि्वटमध्ये लिहिले आहेत. सोबत दु:खी असल्याचे दोन इमोजी पोस्ट केले आहेत.
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, अशी टीम असणार आहे.