IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर सूर्यकुमार यादवने मोकळं केलं मन, काय ते सर्व सांगतिलं

ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने 3-1 ने जिंकली. त्यामुळे रविवारी होणारा पाचवा सामना औपचारिकता असणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात हा मालिका विजय आहे. तसेच भारतात सलग 14 मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर सूर्यकुमार यादवने मोकळं केलं मन, काय ते सर्व सांगतिलं
IND vs AUS : मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव बरंच काही बोलून गेला, अखेर सांगून टाकलं काय ते
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 11:02 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने जिंकली. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी तीन सामने भारताने जिंकले. भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात हा पहिला मालिका विजय आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची संधी दिली नाही. तसेच हवं तसं दव न पडल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार वेडचं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. दव न पडल्याने भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन हावी झाले. फिरकीपटूंनी जबरदस्त गोलंदाजी केली. रवि बिष्णोई आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बॅकफूटला ढकललं.सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने मन मोकळं केलं.

काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार यादव?

“सर्वकाही ठरवल्याप्रमाणे घडलं.मुलांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं. सामन्यापूर्वीच आम्हीच ठरवलं होतं की बिनधास्तपणे येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. दडपण होतं तेव्हा मी अक्षर पटेलची निवड केली. त्याने उत्तम गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये यॉर्करचा प्लान होता तसंच सर्व काही घडलं.”, असं सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर सांगितलं.

रवि बिष्णोई काय म्हणाला?

“मला टीम इंडियासाठी चांगली गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. आज मी चांगली गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. मी आज माझ्या गोलंदाजीने खूश आहे. मी अशीच कामगिरी भविष्यात करत राहीन. आमच्या संघात बरेच तरूण खेळाडू आहेत. प्रत्येक जण चांगली कामगिरी करत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांचे आभार. त्यांनीही मला मोलाची साथ दिली.”, असं रवि विष्णोई याने सांगितलं.

रवि बिष्णोई याने 4 षटकात फक्त 17 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. तसेच अक्षर पटेलने 4 षटकात 16 धावा देत तीन गडी बाद केले. दुसरीकडे भारताची स्थिती नाजूक असताना फलंदाजीच रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. रिंकू सिंहचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. तर जितेश शर्माने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.