राहुल द्रविडनंतर आता त्याचा मुलगा उतरला मैदानात, या टीमकडून मिळाली ऑफर
राहुल द्रविडनंतर त्याचा मुलगा समित मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या धडे घरातूनच मिळाल्यानंतर समितकडून अपेक्षा आहेत. असं असताना समित द्रविडला पहिलं स्टेट क्रिकेट काँट्रॅक्ट मिळालं आहे. लवकरच एका लीगमध्ये स्टार खेळाडूसह दिसणार आहे.
राहुल द्रविडनंतर आता त्याचा मुलगा समित द्रविड मैदानात दिसणार आहे. राहुलच्या द्रविडच्या पावलावर पाऊल टाकत समितने क्रिकेटचे धडे गिरवले. समित द्रविड कर्नाटकसाठी अंडर 19 क्रिकेट संघात देखील खेळला आहे. कर्नाटकने 2023-24 मध्ये कूच बिहार ट्रॉफी जिंकली होती. या संघात समितचा समावेश होता. तसेच या वर्षाच्या सुरुवातील लंकाशर संघाविरुद्ध कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळालं होतं. समित आता महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मैसूर वॉरियर्सने समित द्रविडची संघात निवड केली आहे.मैसूर वॉरियर्स संघाने त्याला 50 हजार रुपयात खरेदी केलं आहे. समितचं वय 18 वर्षे असून मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहे. करुण नायरच्या कर्णधारपदाखाली मैदानात उतरणार आहे. करुण नायर टीम इंडियासाठी खेळला आहे. या व्यतिरिक्त मैसूर वॉरियर्स संघात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाही असणार आहे. त्यामुळे या संघात चांगलं प्रदर्शन करण्याचं दडपण असणार आहे.
समित द्रविड वेगवान गोलंदाज असल्याने त्याला मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मनिष पांडे यासारख्या स्टार खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. या स्टार खेळाडूंनी आक्रमक खेळीने यापूर्वी आयपीएल गाजवलं आहे. त्यामुळे या फलंदाजांना गोलंदाजी करताना चांगलाच दम निघणार आहे. महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीग एकूण सहा संघ आहेत. मैसूर वॉरियर्स, गुलबर्गा मिस्टिक्स, मंगळुरु ड्रॅगन्स, बंगळुरु ब्लास्टर्स, हुबली टायगर्स आणि शिवमोग्गा लायन्स या सहा संघांचा समावेश आहे. दरम्यान, मैसूर वॉरियर्सने अष्टपैलू कृष्णप्पा गौतमला 7.4 लाख रुपये आणि जे सुचितला 4.8 लाख रुपयांना संघात घेतलं आहे. तर वेगवान प्रसिद्ध कृष्णासाठी एक लाख रुपये मोजले.
The first step towards creating his legacy! Welcome aboard, Samit Dravid 💛#MysoreWarriors #GoWarriors #CricketTwitter pic.twitter.com/kN48J0vWY4
— Mysore Warriors (@mysore_warriors) July 25, 2024
मैसूर वॉरियर्सचा संपूर्ण संघ : करुण नायर (कर्णधार), कार्तिक सीए, मनोज भंडागे, कार्तिक एस यू, सुचित जे, गौतम के, विद्याधर पाटील, वेंकटेश एम, हर्षिल धर्माणी, गौतम मिश्रा, धनुष गौडा, समित द्रविड, दीपक देवाडिगा, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जॅस्पर ईजे, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद अशरफ.