RCB vs LSG IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंट्सने रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला एक विकेटने हरवलं. शेवटच्या चेंडूवर या सामन्याचा निकाल लागला. हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. आवेश खान स्ट्राइकवर होता. पेटलने आवेश खानला चकवलं. चेंडू विकेटकीपर दिनेश कार्तिककडे गेला. लखनौच्या फलंदाजांनी धाव घेत विजय मिळवला. या नंतर बँगलोरच्या फॅन्सना महेंद्र सिंह धोनीची आठवण येतेय.
या मॅचमध्ये बँगलोरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 2 विकेट गमावून 212 धावा केल्या. लखनौसाठी लक्ष्य कठीण होतं. शेवटच्या चेंडूवर त्यांनी लक्ष्य गाठलं व एक विकेटने विजय मिळवला. त्यामुळे बँगलोरचे फॅन्स निराश झाले.
I’m sorry dhoni i compared u with a player like dinesh karthik ? pic.twitter.com/S5vXXFa5QE
— M. (@IconicKohIi) April 10, 2023
धोनीची आठवण का आली?
शेवटच्या चेंडूवर जी धाव गेली, ती वाचवता येऊ शकत होती. पण कार्तिकच्या चुकीचा फटका टीमला बसला. कार्तिक शेवटचा चेंडू पकडू शकला नाही. चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्यामुळे लखनौच्या फलंदाजांनी आरामात धाव घेतली. इथेच सर्वांना धोनीची आठवण आली. धोनीचा सात वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल होतोय.
Drama at the Chinnaswamy, a last-ball THRILLER ?#IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL #RCBvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/AIpR9Q4gFB
— JioCinema (@JioCinema) April 10, 2023
धोनीने शेवटच्या क्षणी अशी काय हुशारी दाखवलेली?
2016 T20 वर्ल्ड कपमधला हा व्हिडिओ आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये सामना होता. धोनीने अखेरच्या क्षणी हुशारी दाखवली. समोर हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. पंड्याने चेंडू टाकला. बॅट्समनला त्यावर फटका खेळता आला नाही. धोनीने शांतपणे चेंडू पकडला. हातातले ग्लोव्हज काढले व स्टम्पच्या दिशेने धावत जाऊन बेल्स उडवले. कार्तिकची कृती पाहून सर्वांना धोनी आठवला. धोनीसारखा विकेटकीपर होऊ शकत नाही, असं आता म्हटलं जातय.
Remember this wicket keeper❤️?
.
.
Gambhir Vintage RCB #ShikharDhawanLeakedVideo Pooran #RCBvLSG #LSGvsRCB #ViratKohli Harshal Patel Dinesh Karthik #MSDhoni? Dhoni pic.twitter.com/M91lT3tUtX— सत्यम सिंह रैकवार (@Rajputboy8350) April 10, 2023
दोघांनी बँगलोरची लावली वाट
कार्तिकने चूक करण्याआधी बँगलोरच्या गोलंदाजांनी निराश केलं. आरसीबीने चांगली धावसंख्या उभारली होती. लखनौला विजयासाठी 213 धावा करायच्या होत्या. त्यांना चांगली सुरुवात मिळाली नाही. 23 रन्सवर 3 विकेट गमावले. यात काइल मायर्ससारख्या फलंदाजाचा विकेट होता. त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिसने वादळी बॅटिंग केली. दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला व लखनौचा विजय सुनिश्चित केला.