Video : श्रेयस अय्यर सामन्यानंतर भडकला, स्पष्टच म्हणाला की, “माझ्याविरोधात..”
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी गरजेवेळी योगदान दिलं आहे. पण श्रेयस अय्यरला काही सूर गवसत नव्हता. पण श्रीलंकेविरुद्ध त्याने 82 धावांची खेळी केली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने एकहाती सामने जिंकले आहे. टीम इंडिया सर्वच स्तरांवर अव्वल ठरली आहे. फलंदाजी असो की, गोलंदाजी भारताने चमकदार कामगिरी केली आहे. पण मधल्या फळीत टीम इंडियाला हवं तसं यश मिळत नव्हतं. त्यात श्रेयस अय्यर वारंवार अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात दुसऱ्या खेळाडूला स्थान द्यावं अशी ओरड होत होती. पण कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास दाखवला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त कामगिरी केली. श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावा केल्या. सामन्यानंतर श्रेयस अय्यरने पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना केला. यानंतर एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारताच त्याचा पार चढला. तसेच त्या पत्रकाराला त्याने खडे बोल सुनावले.
पत्रकाराने विचारलं की, आखुड टप्प्याचा चेंडू खेळताना अडचण होत होती, पण श्रीलंकेविरुद्ध चांगले पुल शॉट्स मारले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी किती तयारी केली आहे. कारण त्यांच्या काही गोलंदाज असे आहेत की ते शॉर्ट बॉल टाकतात. या प्रश्नानंतर श्रेयस अय्यर भडकला. त्याने त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न करत विचारलं की, तुला समस्येबाबत काय अडचण आहे? पत्रकाराने पुन्हा एकदा प्रश्न फिरवत विचारलं की, अडचण नाही, पण शॉर्ट बॉलने अय्यरला अडचणीत आणलं हे नक्की आहे.
Shreyas giving clarification on his purported weakness against short balls.. #ShreyasIyer pic.twitter.com/5FQP5hhACk
— Shawstopper (@shawstopper_100) November 2, 2023
प्रश्नानंतर श्रेयस अय्यर भडकला आणि त्या पत्रकाराला विचारलं की, तू बघितलं का अय्यरने किती पुल शॉट्स मारले? जेव्हा तुम्ही चेंडू मारण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही आऊट होऊ शकता. मगत तो शॉर्ट असो की ओवरपिच चेंडू असो. जर तो दोन तीन वेळा बाद झाला तर सांगाल त्याला स्विंगची अडचण आहे.
श्रेयस अय्यर इतक्यावरच थांबला नाही, आरोप करत सांगितलं की, “असं वातावरण तुम्हीच बाहेर तयार केलं आहे की, अय्यरला शॉर्ट बॉल खेळता येत नाही. लोकं फक्त या याच बाबी लक्षात ठेवतात. मुंबईच्या वानखेडेची खेळपट्टी चेंडूला जास्त उसळी देते. मी माझ्या करिअरमधील सर्वाधिक सामने इथेच खेळलो आहे. त्यामुळे मला फलंदाजी कशी करावी हे माहिती आहे. काही शॉट्स खेळताना बाद होण्याची शक्यता जास्त असते. त्यात मी पुल शॉट खेळताना जास्तवेळा बाद झालो म्हणून लोकांना वाटतं मला शॉर्ट बॉल खेळता येत नाही.”