‘दोन वर्षात टीम इंडियासाठी खेळायचंय’, रणजी ट्रॉफी डेब्यू सामन्यात दोन शतकं ठोकणाऱ्या यश धुलचा इरादा पक्का!

नवीन वर्षाची सुरुवात युवा फलंदाज यश धुलसाठी (Yash Dhull) शानदार झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आयपीएल 2022 च्या महा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या बोलीवर हा खेळाडू विकत घेतला.

'दोन वर्षात टीम इंडियासाठी खेळायचंय', रणजी ट्रॉफी डेब्यू सामन्यात दोन शतकं ठोकणाऱ्या यश धुलचा इरादा पक्का!
Yash Dhull
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 9:46 AM

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात युवा फलंदाज यश धुलसाठी (Yash Dhull) शानदार झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आयपीएल 2022 च्या महा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या बोलीवर हा खेळाडू विकत घेतला. त्यानंतर या युवा खेळाडूने रणजी करंडक स्पर्धेत डेब्यू केला. आता रणजी ट्रॉफीमध्येदेखील (Ranji Trophy) त्याची दमदार सुरुवात झाली आहे. यश धुलने दिल्लीकडून पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली. तामिळनाडूविरुद्धच्या (Tamil Nadu) पहिल्या रणजी सामन्याच्या दोन्ही डावांत त्याने शतक झळकावले. दोन्ही डावात त्याने 113 आणि 113 धावा केल्या. रणजी पदार्पणात दोन्ही डावात शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 1952-53 मध्ये नारी कॉन्ट्रॅक्टर आणि 2012-13 मध्ये विराग आवटे यांनी हा चमत्कार केला होता.

पहिल्याच सामन्यानंतर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपले नाव नोंदवल्यानंतर यश धुलने आपले पुढील लक्ष्य तयार केले आहे. पुढील दोन वर्षांत टीम इंडियाकडून खेळण्याचे त्याचे लक्ष्य आहे. भारतासाठी खेळायचे आहे पण सध्या पुढच्या सामन्यावर लक्ष आहे.” दिल्लीला 24 फेब्रुवारीपासून झारखंडविरुद्ध पुढील रणजी सामना खेळायचा आहे.

2 वर्षात टीम इंडियासाठी खेळण्याचे लक्ष्य : यश धुल

धुल म्हणाला, “मी माझे ध्येय सज्ज केले आहे की मला पुढील 18 ते 24 महिन्यांत भारताच्या वरिष्ठ संघात खेळायचे आहे. सध्यातरी ते स्वप्नच आहे. पण मी मेहनत करायला सुरुवात केली आहे. तिथे पोहोचण्यासाठी मला खूप धावा कराव्या लागतील. मी आता झारखंडविरुद्धच्या सामन्याची तयारी करेन. क्रिकेटचा नियम आहे की, तुम्ही एका वेळी फक्त एका सामन्यावर लक्ष केंद्रित करावं.

यशचं दोन्ही डावात शतक

तामिळनाडू (Tamilnadu) विरुद्ध यशने पहिल्या डावात 113 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शानदार शतक झळकवल आहे. डेब्यू सामन्यातच दोन्ही डावात शतक झळकवणारा यश रणजीमधला तिसरा फलंदाज बनला आहे. तामिळनाडू विरुद्धच्या रणजी लढतीत यशने पहिल्या डावात नाबाद 113 धावांची खेळी केली होती. त्याने 16 चौकार लगावले होते. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला 57 चेंडू लागले. यश रणजीमधलं पहिलं शतक पूर्ण करण्यासाठी 133 चेंडू खेळला. दिल्ली आणि तामिळनाडूमधला हा कसोटी सामना ड्रॉ झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 452 धावा केल्या. युवा फलंदाज शाहरुख खानचं द्विशतक फक्त सहा धावांनी हुकलं.

इतर बातम्या

IND vs WI : सूर्यकुमारची आतषबाजी, भारताचा विंडिजवर क्लीन स्विप विजय, ICC T20 रॅकिंग्समध्ये पहिल्या स्थानवर कब्जा

IND vs WI : वेस्ट इंडिजचा कंजूष गोलंदाज, ज्याच्यासमोर रोहित-इशान आणि विराटही हतबल

IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.