लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाच वर्चस्व दिसून आलं. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा दबदबा होता. पहिलं सेशन टीम इंडियाच्या नावावर होतं. पण नंतरच्या दोन सेशन्समध्ये ऑस्ट्रेलियाची दादागिरी दिसून आली. पहिल्या सेशनमध्ये आग ओकणारे भारतीय बॉलर्स नंतरच्या दोन सेशनमध्ये बॅकफूटवर गेले. भारतीय बॉलर्सची ही स्थिती पाहून इरफान पठानने एक टि्वट केलय. या टि्वटचा इशारा IPL कडे आहे.
इरफान पठानने सोशल मीडियावर भारतीय गोलंदाजीबद्दल रिएक्शन दिली आहे. इरफानने आपल्या टि्वटमधून भारतीय गोलंदाजांना मोठा फरक दाखवून दिलाय.
इरफानने टि्वटमध्ये काय म्हटलय?
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने आपल्या टि्वटमध्ये IPL चा उल्लेख केलेला नाहीय. पण त्याचा इशारा आयपीएलकडेच आहे. “4 ओव्हर गोलंदाजी केल्यानंतर थेट 15-20 ओव्हर गोलंदाजी करणं एक मोठी झेप असते” असं इरफानने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय. इरफानने खूप मोजक्या शब्दात टि्वट केलय. पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे.
From Bowling 4 overs regularly to bowling 15-20 overs a day is a big jump. #INDvsAUS
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 7, 2023
कोणी-कशी गोलंदाजी केली?
WTC Final च्या पहिल्या दिवसाच्या खेळात मोहम्मद शमीने 20 ओव्हर्समध्ये 77 धावा देऊन 1 विकेट घेतला. मोहम्मद सिराजने 19 ओव्हर्समध्ये 67 धावा देऊन 1 विकेट काढला. शार्दुल ठाकूरने 18 ओव्हरमध्ये 75 रन्स देऊन 1 विकेट काढला. रवींद्र जाडेजाने 14 ओव्हरमध्ये 48 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाला नाही.
पहिल्या सेशनमध्ये यशस्वी कसे ठरले?
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सेशनच्या खेळात तीन विकेट काढले. नंतरच्या दोन सेशनमध्ये एकही विकेट मिळाला नाही. त्याशिवाय गोलंदाजीतही पहिल्या सेशनसारखी धार दिसली नाही. पहिल्या सेशनमध्ये विकेट, वातावरणाची साथ मिळाली, त्यामुळे भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. पण दुसऱ्या सेशनमध्ये पीच आणि हवामानाची साथ मिळाली नाही.