चंदीगड : प्रसिद्ध क्रिकेटपटू, मोटिवेशनल स्पीकर, कॉमेंटेटर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीच्या तिसऱ्या केमो थेरपीनंतर टि्वटरवर व्हिडिओ आणि मेसेज पोस्ट केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी या मेजेसमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांच कौतुक केलय. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीची हिम्मत वाढवण्याचा तिला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्याशिवाय या मेसेजमध्ये एक अशी ओळ आहे, ज्यावरुन सिद्धू एकटे पडल्यास दिसतय.
नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 2 चा कॅन्सर आहे. यावर्षी मार्च महिन्यात विविध चाचण्यांमधून त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्याच निष्पन्न झालं. नवज्योत सिंह सिद्धू त्यावेळी पतियाळाच्या सेंट्रल कारागृहात होते. 1988 सालच्या रोड रेज प्रकरणात त्यांना एकवर्ष तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सिद्धू यांनी त्यांच्या संदेशात काय म्हटलय?
“तिचा तिसरा केमो झाला. दृढनिश्चयी माणसासाठी काही अशक्य नाहीय. तिच्या पोलादी खंबीरपणाला डॉ. रुपिंदर बात्रा यांची साथ मिळाली. काहीतरी कर्माच कनेक्शन आहे. मी तुरुंगात असताना, मला प्राणघातक फुफ्फुसाच्या रक्ताभिसरणा संबंधित आजार झाला होता. त्यावेळी त्यांनी मला वाचवलं. चांगल्या दिवसात भरपूर मित्र तुमच्यासोबत असतात. पण संकटकाळात त्या वीसापैकी एकही सोबत नसतो” अशी खंत देखील सिद्धू यांनी बोलून दाखवलीय.
Her third Chemo……. Nothing is impossible for a resolute person……. her steely resolve has been facilitated by Dr.Rupinder Batra (Former Tata Memorial Oncologist) at Waryam Singh Hospital, Yamunanagar
There is a karmic connection……. He saved my life as well when I had… pic.twitter.com/1RIEXHI5i0
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) June 25, 2023
ऑल वेल?
सिद्धू यांनी व्हिडिओसोबत ही पोस्ट केलीय. व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी बेडवर असून सिद्धू आणि डॉक्टर तिच्या बाजूला उभे आहेत. सिद्धू तिला ऑल वेल? म्हणून विचारतात, त्यावर ती येस असं उत्तर देते.
‘तुमच्यापेक्षा मला जास्त त्रास होतोय’
नवज्योत कौर यांनी टि्वटरवरुन त्यांना कॅन्सरच निदान झाल्याची माहिती दिली होती. “जो गुन्हा केलाच नाही, त्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू तुरुंगात आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना माफ करा. तुरुंगाबाहेर प्रत्येकदिवस मी तुमची वाट पाहतेय. तुमच्यापेक्षा मला जास्त त्रास होतोय” असं नवज्योत कौर यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.