भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 जिंकली. भारताने दुसरा सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. मात्र शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अपेक्षित कामगिरी करून मालिका जिंकली. मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार हरमनप्रीत कौर हीने एक खंत बोलून दाखवली आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 10:33 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 खिशात घातली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 232 धावा केल्या आणि विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 44.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. स्मृती मंधानाचं शतक आणि हरमनप्रीत कौरचं नाबाद 59 धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. या सामन्यातील कामगिरीसाठी स्मृती मंधानाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडकडून ब्रूके हालिडेने जबरदस्त फलंदाजी केली. एकीकडे झटपट विकेट जात असताना एकाकी झुंज देली. 96 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर प्रिया मिश्राला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. रेणुका सिंग आणि साइमा ठाकोर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान या विजयानंतर हरमनप्रीत कौरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मी सकाळी म्हटल्याप्रमाणे, आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि आज आम्ही ते करू शकलो याचा आनंद आहे. आम्ही जेव्हाही खेळतो तेव्हा आम्हाला नेहमी आमचे 100 टक्के द्यायचे असते परंतु काहीवेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. एक प्रोफोशनल क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला पुढे जात राहावे लागेल. आम्ही संघाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा केली त्यामुळे शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर आम्ही कमबॅक करू शकलो. या विजयाचं श्रेय स्मृतीला द्यायला आवडेल. ती सुरुवातीपासूनच संघर्ष करत होती पण ती धावा करण्यात यशस्वी झाली. ही मालिका कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. आमच्या भागीदारीबद्दल खरोखर आनंदी आहे.”, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

“आम्ही नेहमी आमच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलत असतो, हे एक क्षेत्र आहे ज्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आम्ही कठोर परिश्रम करत आहोत परंतु जोपर्यंत आम्ही सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करू शकत नाही तोपर्यंत निकालाची वाट पाहत आहोत.”, अशी मत कर्णधार हरमनप्रीत कौर हीने व्यक्त केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.