ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकल्यानंतर टीम इंडियाला झटका, संघातून दोघे बाहेर
दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढलीय.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 सीरिज (Ind vs aus t20 3rd) जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. आता पुन्हा एकदा दोन खेळाडू टीम इंडियाच्या संघात नसणार आहे. यापूर्वी देखील काही खेळाडूंना दुखापत झाल्यानं ते संघाबाहेर होते. यामुळे बीसीसीआयची (BCCI) डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर आता देखील दोन खेळाडू संघाच्या बाहेर गेल्यानं पुन्हा एकदा टीम इंडिया आणि बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी टीम इंडियात कधी पुनरागमन करणार माहित नाही. शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजपूर्वी कोरोना झाला. त्यामुळे तो घरी आहे. आताही त्याच्या परतण्यावर काही सांगता येत नाही. त्याला किती वेळ लागणार, यावरही प्रश्नचिन्ह आहे.
दीपक हुड्डा
यातच आता टीम इंडियाला आणखी एक झटका बसला असून दीपक हुड्डा देखील पाठिच्या दुखण्यामुळे घरी बसू शकतो. बीसीसीआयनं यापूर्वी म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज सुरु होण्याआधी सांगितलं होतं की, दीपकला पाठिचा त्रास आहे. त्याला जखम आहे. त्यामुळे तो संघात नसणार.
बीसीसीआयची डोकेदुखी
आता एका रिपोर्टनुसार दीपक हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बसीसीआयसमोर डोकेदुखी वाढली आहे. संघात दमदार खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे दीपक हुड्डाच्या जागी आता कोण येणार याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडियासोबत शमी तिरुअनंतपुरम या ठिकाणी गेला नाही. या ठिकाणी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे. शमीच्या जागी उमेश यादव गेलाय. रविवारी टीम इंडिया केरळला पोहोचली आहे.
शमी स्टँडबाय
टी-20 विश्वचषकासाठी शमी जाणार की नाही, याबाबत आताही शंका आहे. याबाबत काहीही स्पष्ट नाही. टी-20 विश्वचषकात शमी हा मुख्य टीममध्ये नाही आहे. त्याला स्टँडबाय ठेवण्यात आलंय.