World Cup 2019नंतर ‘या’ फलंदाजानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर…

विराट कोहलीने प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या डावात शतक किंवा मोठी धावसंख्या करावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. विराट कोहलीकडून ती पूर्ण होत नाहीय. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑगस्टमध्ये पुनरागमन करू शकतो.

World Cup 2019नंतर 'या' फलंदाजानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...
रोहित शर्माImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 9:22 AM

मुंबई : विराट कोहलीनं (Virat Kohali) गेल्या जवळपास तीन वर्षांपासून शतक झळकावलेले नसले तरी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळलेल्या विश्वचषक 2019 नंतर भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. तो दुसरा कोणी नसून विराट कोहली आहे. यावरून हे स्पष्ट होते की विराट कोहली भलेही त्याच्या स्वतःच्या मानकांनुसार खेळत नसेल, पण तरीही त्याची बॅट धावा करत आहे आणि तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या बाबतीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या स्थानावर आहे. ICC क्रिकेट विश्वचषक 2019 (World Cup 2019) पासून विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचवेळी रोहित शर्मा या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याविषयी अधिक जाणून घ्या…

विराट कोहलीने 3500 हून अधिक धावा केल्या आहेत, तर रोहितला 3400 धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. WC 2019 पासून विराटने 3564 धावा केल्या आहेत. रोहितने 3318 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने 2593 धावा केल्या आहेत. KL राहुलने 2524 धावा केल्या आहेत आणि श्रेयस अय्यरने 2124 धावा केल्या आहेत. हे असे पाच फलंदाज आहेत जे 2019 च्या विश्वचषकापासून टीम इंडियासाठी सतत खेळत आहेत.

वर्ल्ड कप 2019 नंतर भारतासाठी सर्वाधिक धावा

  1. 3564 धावा – विराट कोहली
  2. 3318 धावा – रोहित शर्मा
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2593 धावा – ऋषभ पंत
  5. 2524 धावा – केएल राहुल
  6. 2124 धावा – श्रेयस अय्यर

ही आकडेवारी पाहता विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्याचे कुठूनही स्पष्ट होत नाही, मात्र तरीही त्याच्यावर टीका होत आहे.यामागचे कारण म्हणजे विराट कोहली गेल्या दशकात ज्या प्रकारचे क्रिकेट खेळला आहे त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विराट कोहलीने प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या डावात शतक किंवा मोठी धावसंख्या करावी अशी चाहत्यांची इच्छा आहे, जी सध्या विराट कोहलीच्या बॅटने दिसत नाही.विराट सध्या ब्रेकवर असून तो ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

ICC क्रिकेट विश्वचषक 2019 (World Cup 2019) पासून विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे डोळेझाक करता येणार आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याची कामगिरी सुमार असली तरी त्याच्या एकूणच कामगिरीकडे पाहता तो पुन्हा एकदा यशस्वी झेप घेईल असं दिसतंय. संधी आणि प्रयत्न या दोन गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.