Video : आगे बढेगा…आगे बढेगा..! ध्रुव जुरेलने आधीच केला इशारा आणि ओली पोप अडकला जाळ्यात
भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. इंग्लंडच्या बेझबॉलची हवा काढली आणि मालिका 3-1 ने खिशात घातली. या स्पर्धेत ध्रुव जुरेलची चमकदार कामगिरी दिसली. ओली पोपची खेळी ओळखून सापळा रचला आणि अडकवलं.
मुंबई : राजकोट कसोटीतून ध्रुव जुरेलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हा ध्रुवच्या कसोटी कारकिर्दितला तिसरा सामना आहे. पण आतापर्यंतच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. ध्रुव जुरेल नुसता फलंदाजीनेच नाही तर विकेटच्या मागूनही खेळी करण्यात यशस्वी ठरला. त्याची विकेटकीपिंग पाहून त्याची तुलना थेट महेंद्रसिंह धोनीशी केली जात आहे. कारण फलंदाजाच्या डोक्यात काय सुरु आहे याचा अंदाच आधीच घेऊन सापळा रचण्यात पटाईत होता. असंच काहीसं विकेटकीपर ध्रुव जुरेल याने पाचव्या कसोटी सामन्यात केलं. बेन डकेट बाद झाल्यानंतर इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यासाठी आणखी एका विकेटची गरज होती. यासाठी कर्णधार रोहित शर्माचे प्रयत्न सुरु होते. यासाठी गोलंदाजीच्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढत होता. पहिली विकेट कुलदीपला मिळाल्याने त्याचा दिवस आहे हे रोहितने बरोबर ओळखलं आणि गोलंदाजीसाठी प्राधान्य दिलं. कुलदीप यादवला खेळाडूंचीही तशीच साथ मिळाली. गिलने सर्वात कठीण झेल घेऊन यश मिळवून दिलं. तसेच ध्रुव जुरेलने ओली पोपचा डाव ओळखून सापळा रचला.
रोहित शर्माने 26 वं षटक कुलदीप यादवच्या हाती सोपवलं. पहिल्या चेंडूवर क्राउलने एक धाव घेत संघाच्या 100 धावा पूर्ण करून दिल्या. दुसरा चेंडू ओली पोपला निर्धाव टाकला. ओली पोप धावांसाठी झगडत असल्याचं दिसून येत होतं. तसेच एक एक धाव घेण्यासाठी त्याची दमछाक होत होती. 22 चेंडूत 11 धावा हे त्याच्या नैसर्गिक खेळ आणि बेझबॉल रणनितीच्या विरोधात होतं. त्यामुळे तो धावांसाठी चान्स घेणार हे ध्रुव जुरेलने ओळखलं होतं. तिसऱ्या चेंडूआधीच ध्रुवने कुलदीपला सांगितलं. आगे बढेगा..आगे बढेगा…हे सर्वकाही स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि तसंच झालं.
Kuldeep sends Pope packing with a Jaffa 🤯🤌
India get their second wicket at the stroke of Lunch 🙌#IDFCFirstBankTestSeries #BazBowled #INDvENG #JioCinemaSports pic.twitter.com/gQWM3XYEEg
— JioCinema (@JioCinema) March 7, 2024
कुलदीपच्या तिसऱ्या चेंडूवर उंच फटका मारण्यासाठी ओली पोप पुढे सरसावला. कुलदीप आधीच अलर्ट असल्याने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला आणि ओली पोप बरोबर फसला. ध्रुवने चेंडू पकडला आणि क्षणाचाही विलंब न करता स्टंपिंग केलं. यामुळे ओली पोपची खेळी 11 धावांवर संपुष्टात आली. ध्रुवच्या या खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. टीमला अशाच विकेटकीपरची गेल्या काही वर्षांपासून गरज होती. ध्रुव जुरेलच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होईल अशी आशा आता क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.