लेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट

हार्दिकची बायको नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ आहे आई लेकाच्या गोड मिठीचा...! (Agastya hug Natasa Stankovic Hardik Pandya Comment)

लेकाची आईला मिठी, बाप हार्दिकची खास कमेंट
Agastya hug Natasa Stankovic
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 6:38 AM

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. सध्या आयपीएल स्थगित झाल्याने हार्दिक कुटुंबासमवेत आहे. टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू इंग्लंड दौऱ्याची तयारी करतायत. हार्दिकचा इंग्लंड दौऱ्यात समावेश झालेला नाही. आगामी श्रीलंका दौऱ्यावर हार्दिककडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हार्दिकची बायको नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ आहे आई लेकाच्या गोड मिठीचा…! (Agastya hug Natasa Stankovic Hardik Pandya Comment)

चिमुरड्या लेकाची आईला मिठी

नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओत माय लेकाची मस्ती सुरु आहे. हसणं बागडणं सुरु आहे. इतक्यात मुलगा अगस्त्य (Agastya) आई नताशाला मिठी मारतोय. चिमुरड्या लेकाच्या मिठीनंतर नताशा खूप खूश होतीय. तिने आनंदात हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नेटकरीही या व्हिडीओला पसंत करताना दिसून येत आहेत.

बाप हार्दिकची खास कमेंट

चिमुरड्या लेकाने आईला मारलेल्या गोड मिठीवर बाप हार्दिक पांड्याने खास कमेंट केली आहे. ही माझी आवडती मिठी आहे, असं नताशाने म्हटलं आहे. तर हार्दिकने रेड हर्ट शेअर करत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Hardik Pandya Comment

हार्दिकची कमेंट

हार्दिक नताशा सेलिब्रेटी कपल

हार्दिक आणि नताशा हे सेलिब्रेटी कपल आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे ही जोडी चर्चेत असते. गेल्याच वर्षी त्यांनी एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.

क्रिकेटपटू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

आयपीएल स्थगित झाल्यापासून बरेच क्रिकेटपटू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले. बऱ्याचश्या क्रिकेटपटूंनी काही फोटो, व्हिडीओ, मौजमजा करतानाचे क्षण आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, ज्या फोटो-व्हिडीओजना फॅन्सनी पसंत केलं. (Agastya hug Natasa Stankovic Hardik Pandya Comment)

हे ही वाचा :

WTC Final : भारताचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडसाठी मोठा धोका, फलंदाज हेन्री निकोल्सने वर्तवली चिंता

आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी, तरीही ‘या’ भारतीय खेळाडूसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद!

Video : ”तू इतका बारीक माझी बॅट तरी उचलेल का?”, सूर्यकुमार यादवकडून चहलची मस्करी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.