DC vs MI IPL 2023 : मागच्या सीजनप्रमाणे यंदाच्या मोसमातही मुंबई इंडियन्स टीमचा विजयासाठी संघर्ष सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झालाय. आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि नंतर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवलं. मुंबईच्या टीममध्ये अनेक मोठी नावं आहेत. युवा प्रतिभावान खेळाडू आहेत. पण, तरीही मुंबई इंडियन्सचा मैदानात संघर्ष सुरु आहे. आता क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावून आलाय.
सचिनने आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी मुंबईच्या एका प्रमुख खेळाडूला काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स चालल्या, तर आजच्या सामन्यात मुंबईची टीम धमाकेदार कामगिरी करु शकते.
सचिनने काय सल्ला दिला?
मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला सचिन तेंडुलकरकडून बहूमुल्य मार्गदर्शन मिळालय. सचिनने कॅमरुन ग्रीनला काही टिप्स दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात ग्रीन सचिन तेंडुलकर बरोबर चर्चा करताना दिसतोय. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात बॅटचा चेहरा कशाप्रकारे हाताळायचा, त्याबद्दल सचिनने ग्रीनला मार्गदर्शन केलं.
सचिनने बॅटच्या फेसबद्दल काय सांगितलं?
टेस्ट क्रिकेटमध्ये चेंडूला जमिनी लगत ठेवण्यासाठी बॅटचा चेहरा हलका झाकून घ्यायचा, तेच वनडे, टी 20 मध्ये ऑफ साइडला खेळण्यासाठी बॅटचा फेस ओपन पाहिजे, असं सल्ला तेंडुलकरांनी दिल्याच ग्रीनने सांगितलं.
मुंबईने त्याला किती कोटीला विकत घेतलय?
कॅमरुन ग्रीनला आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलय. पण या खेळाडूला अजून आपली छाप उमटवता आलेली नाही. या ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरने प्राइस टॅगची चिंता करत नसल्याच सांगितलं. ग्रीन मुंबई इंडियन्ससाठी नंबर 3 पोजिशनवर खेळतोय. तू सलामीला येणार का? या प्रश्नावर कॅमरुन ग्रीनने कोच सांगितल, त्या क्रमांकावर खेळेन असं उत्तर दिलं.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कॅमरन ग्रीन, रिले मेरेडिथ, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, डुआन यानसेन, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, रमनदीप सिंह,पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, विष्णु विनोद, शम्स मुलानी, अर्शद खान, राघव गोयल.