Ajinkya Rahane ला 2 दिवसांतच झटका, टीममधून विश्रांती की डच्चू? निवड समितीचा निर्णयामुळे खळबळ
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच रहाणेला संघात स्थान मिळालं नाही.
मुंबईने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात 15 डिसेंबरला मध्य प्रदेशचा धुव्वा उडवत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच मुंबई टीमचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला याच्याबाबत हैराण करणारी बातमी समोर आली आहे. एमसीए वरिष्ठ निवड समितीने आगामी विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या 3 सामन्यांसाठी 17 सदस्यीय मुंबई संघ जाहीर केला आहे. पुन्हा एकदा श्रेयस अय्यर हाच मुंबईचं नेतृत्व करणार आहे. टीममधून पृथ्वी शॉ याचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर या संघात अजिंक्य रहाणे याचं नावही वगळण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विश्रांती की डच्चू?
अजिंक्य रहाणेऐवजी श्रेयस अय्यर याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्णधारपद देण्यात आलं. तेव्हा खांदेपालट केली की हकालपट्टी हे समजू शकलं नव्हतं. त्यानंतर आता रहाणेचा संघात समावेश नाही. त्यामुळे रहाणेला विश्रांती देण्यात आली आहे की डच्चू? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तसेच रहाणेचा उर्वरित सामन्यांसाठी समावेश केला जाईल, असंही म्हटलं जात आहे.
आयुष म्हात्रे याचं कमबॅक झालं आहे. आयुष म्हात्रे नुकत्याच झालेल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानंतर आता त्याचं कमबॅक झालंय. तर संघातून पृथ्वी शॉ याचा पत्ता कट करण्यात आला आहे.
रहाणे मॅन ऑफ द सीरिज
दरम्यान रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. रहाणेने 9 सामन्यांमधील 8 डावांमध्ये 469 धावा केल्या. मात्र त्यानंतर रहाणेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान मुंबई विजय हजारे स्पर्धेत एकूण 7 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने गुजरातमधील विविध ठिकाणी खेळव्यात येणार आहेत. मुंबई आपला पहिला सामना हा 21 डिसेंबरला कर्नाटकविरुद्ध खेळणार आहे. तर साखळी फेरीतील अंतिम सामना हा 5 जानेवारीला होणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई टीम : श्रेयस लियर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटीयन, शार्दूल ठाकुर, रोयस्टन डायस, जुनेद खान , हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.