18 महिन्यानंतर संघात परतलेल्या रहाणेला नशिबाची साथ, पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर झाला होता बाद; पण…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला असताना टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि जडेजाकडून अपेक्षा आहेत.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची स्थिती एकदम नाजुक झाली आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना 71 धावांवरच चार गडी बाद झाले. रोहित शर्मा 15, शुभमन गिल 13, चेतेश्वर पुजारा 14 आणि विराट कोहली 14 धावा करून बाद झाले. त्यामुळे 18 महिन्यानंतर संघात परतलेल्या अजिंक्य रहाणेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळणं गरजेचं आहे. पण एक क्षण असा आला की भारतीय क्रीडाप्रेमींनी अपेक्षा सोडून दिल्या. कारण पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेला पंचांनी पायचीत दिलं. पण नशिब जोरावर असेल तर कोण काय करू शकतं? अजिंक्य रहाणेनं रिव्ह्यू घेतला आणि चमत्कार घडला.
रिव्ह्यू तपासत असताना असं लक्षात आलं की पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू नो बॉल होता. त्यामुळे अजिंक्य रहाणेला जीवदान मिळालं. त्यामुळे आता त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवशी रहाणे आणि जडेजाने मोठी खेळी केली तर संघाला फायदा होऊ शकतो.
Umpires give out for Rahane in the field.
But it's a no-ball. pic.twitter.com/xjySKnAMP5
— Johns. (@CricCrazyJohns) June 8, 2023
2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून मालिका गमावल्यानंतर अजिंक्य रहाणेला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आतापर्यंत अजिंक्य रहाणे 82 कसोटी सामना खेळला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.