Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याच्याकडे टीमचं कर्णधारपद, आणखी कुणाला संधी?

| Updated on: Jan 02, 2024 | 6:20 PM

Ajinkya Rahane Captaincy | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाची लाज राखली होती. मात्र त्यानंतरही रहाणेला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली नाही. त्यानंतर आता रहाणेला आनंदाची बातमी मिळाली आहे.

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याच्याकडे टीमचं कर्णधारपद, आणखी कुणाला संधी?
Follow us on

मुंबई | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया सध्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतर आता नववर्षाच्या सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे याच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अजिंक्य रहाणे याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रणजी ट्रॉफी 2024 मधील पहिल्या 2 सामन्यासाठी मुंबई टीमची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अजिंक्य रहाणे पहिल्या 2 सामन्यात मुंबईचं नेतृत्व करणार आहे. या टीममध्ये पृथ्वी शॉ याला दुखापतीमुळे संधी मिळाली नाही. तर टीम इंडियासह असल्याने यशस्वी जयस्वाल या स्पर्धेला मुकणार आहे. तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर आहे.

मुंबईचे पहिले 2 सामने

मुंबई रणजी ट्रॉफीतील आपला पहिला सामना बिहार विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 5 जानेवारी रोजी पार पडणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात मुंबईसमोर आंध्र प्रदेशचं आव्हान असणार आहे. हा सामना 12 जानेवारी रोजी होणार आहे. मुंबईला 2023 साली अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईला बाद फेरीत पोहचण्यात अपयश आलं होतं. मुंबईचा 2022 मध्ये अंतिम फेरीत पराभव झाला होता. मुंबईने अखेरीस 2015 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे यंदा मुंबईचा 9 वर्षांनी रणजी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या 2 सामन्यासाठी मुंबई क्रिकेट टीम

सौराष्ट्र गतविजेता

दरम्यान सौराष्ट्रने 2023 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. सौराष्ट्रने 2023 मध्ये अंतिम सामन्यात बंगालचा पराभव केला होता.

रणजी ट्रॉफी 2024 मधील पहिल्या 2 सामन्यासाठी मुंबई टीम | अजिंक्य रहाणे (कॅप्टन), सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, शम्स मुलानी, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), जय बिस्टा, भूपेन लालवानी, तनुष कोटीयन , तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.