Ajinkya Rahane : ‘अजिंक्य रहाणे टीम इंडियामध्ये दिसला तर…’, दिग्गज खेळाडूचं एकच वाक्य पण लाखमोलाचं!
कसोटी संघातून गच्छंती झाल्यावर रहाणेला संघात जागा बनवता आली नाही. मात्र यंदाच्या सीझनमध्ये अजिंक्यने फक्त धावांचा पाऊसट पाडला नाहीतर आक्रमक बॅटींग करत त्याने विरोधी संघाच्या बॉलर्सला नेस्तनाबूत केलं आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेचं वादळ पाहायला मिळालं. सीएसकेने पहिल्यांदा बॅटींग करताना 235 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य केकेआरसमोर ठेवलं आहे. रहाणेने अवघ्या 29 चेंडू नाबाद 71 धावांची जबदस्त खेळी केली. यामध्ये त्याने चौफेर फटेबाजी करत मोठे फटके खेळले. कसोटी संघातून गच्छंती झाल्यावर रहाणेला संघात जागा बनवता आली नाही. मात्र यंदाच्या सीझनमध्ये अजिंक्यने फक्त धावांचा पाऊस पाडला नाहीतर आक्रमक बॅटींग करत त्याने विरोधी संघाच्या बॉलर्सला नेस्तनाबूत केलं आहे.
अजिंक्य रहाणेची बॅटींग पाहून भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने मोठं वक्तव्य केलं आहे. अजिंक्यला परत एकदा भारतीय कसोटी संघात पाहिलं तर आश्चर्य वाटालया नको, असं रॉबिन उथप्पा म्हणाला. रहाणेला चेन्नईने आपल्या ताफ्यात सामील केल्यावर अनेकांनी त्यांना एका कसोटी खेळाडूला संघात घेतलं म्हणून ट्रोल केलं होतं. या टीकाकारांची तोंड रहाणेने आपल्या बॅटने बंद केली आहेत.
अजिंक्यने पाच सामन्यांमध्ये 209 धावा केल्या आहेत. मुंबईविरूद्ध 27 चेंडूत 61 धावा, राजस्थान रॉयल्सविरूद्ध 19 चेंडूत 31 धावा, आरसीबीविरूद्ध 20 चेंडूत 37 धावा, सनराइजर्स हैदराबाद 10 चेंडू 9 धावा आणि आज चेन्नईविरूद्ध 29 चेंडूत 71 धावा त्याने आतापर्यंत केल्या आहेत.
अजिंक्य रहाणेच नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे चेन्नईमध्ये येणारे युवा आणि अनुभवी सर्वच खेळाडू उत्तम प्रदर्शन करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे रहाणेही या ताफ्यात सामील झाल्यावर धोनीच्या नेतृत्त्वाखाली आत्मविश्वासाने खेळताना दिसत आहेत.
केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा