हार्दिकने शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घेतलेला निर्णय पाहून आकाश अंबानी संतापला, अशी होती रिएक्शन
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईला या धावा गाठताना 12 धावा कमी पडल्या. शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या पूर्ण करू शकला नाही. तर तिसऱ्या चेंडूवर आकाश अंबानी वैतागलेला दिसला.

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हन दिलं होतं. पण मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या. खरं तर मुंबई इंडियन्स विजय मिळवेल अशी स्थिती होती. 12 चेंडूत 29 धावा सहज होतील असं वाटलं होतं. पण शार्दुल ठाकुरने 19 वं षटक जबरदस्त टाकलं. त्यात सेट बॅट्समन तिलक वर्माला रिटायर केल्याने आश्चर्याचा धक्का बसला. 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने एक धाव घेत तिलकला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर तिलकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. असं पाचव्या चेंडूपर्यंत चाललं. पण शेवटच्या चेंडूवर तिलक वर्मा स्ट्राईकला असताना त्याला रिटायर केलं. यावेळी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सँटनर मैदानात आला आणि दोन धावा घेत शेवटच्या षटकासाठी हार्दिकला स्ट्राईक दिली.
शेवटच्या षटकात 9 चेंडूत 22 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या स्ट्राईकला होता. पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारला आणि 5 चेंडूत 18 धावा अशा स्थितीत सामना आणला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. चार चेंडूत 14 धावांची गरज होती. हार्दिक पांड्यान तिसरा चेंडू मारला पण धाव घेतली नाही. मध्यात आलेल्या सँटनरला परत पाठवलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण सँटनरला तिलक वर्माला रिटायर करून मैदानात बोलवलं होतं. त्याला स्ट्राईक न देण्याचं कारण कळलं नाही. त्यामुळे आकाश अंबानी वैतागलेला दिसला. चौथ्या चेंडूवर धाव आली नाही. पाचव्या चेंडूवर पांड्याने एक धाव काढली. शेवटच्या चेंडूवर सँटनर काही करू शकला नाही आणि सामना लखनौने जिंकला.
MI Owner Akash Ambani reaction When Hardik Pandya on 19.3 Balls not takes the Single.#LSGvsMI pic.twitter.com/BCznQ7fc5J
— Vikas Yadav (@VikasYadav69014) April 4, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, दीपक चहर, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट.