EngvsAus : जो रूटने केली कमाल, गोळीच्या वेगाने चाललेल्या चेंडूचा घेतला अफलातून झेल, पाहा Video

कॅरीला आऊट करताना जो रूटने खतरनाक झेल घेतला. गोळीच्या वेगाने चेंडू चालला होता मात्र रूटने एखाद्या बुरूजासारखे आपले दोन्ही हात मध्ये घालत कॅच पकडला.

EngvsAus : जो रूटने केली कमाल, गोळीच्या वेगाने चाललेल्या चेंडूचा घेतला अफलातून झेल, पाहा Video
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 11:44 PM

मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामधील थरार वाढतच चालला आहे. सामना कधी ऑस्ट्रेलिया तर कधी  इंग्लंडच्या पारड्यामध्ये झुकताना दिसला. पाचव्या दिवशी, 281 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या  गोलंदाजांनी कांगारूंना धक्के दिले. उस्मान ख्वाजा हा एकटा मैदानात पाय रोवून बसला होता. त्यालाही 65 धावांवर माघारी पाठवलं.

209 धावांत 7 गडी बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी आणि कर्णधार पॅट कमिन्स यांच्यावर येऊन पडली होती. पण कॅरीला आऊट करताना जो रूटने खतरनाक झेल घेतला. गोळीच्या वेगाने चेंडू चालला होता मात्र रूटने एखाद्या बुरूजासारखे आपले दोन्ही हात मध्ये घालत कॅच पकडला.

पाहा व्हिडीओ- 

81 व्या ओव्हरमध्ये जो रूट गोलंदाजी करत होता, तिसऱ्या चेंडूवर कॅरी मोठा फटका खेळण्यासाठी पुढे आला आणि चेंडू जोरात फटकावला. त्यावेळी रूटने अचूक टायमिंग साधत कॅच घेतला. कॅरी 50 चेंडूत 20 धावा करून आऊट झाला आणि 227 ला कांगारूंच्या आठ विकेट्स पडल्या.

कॅरीने पहिल्या डावामध्ये दमदार फलंदाजी केली होती. 99 चेंडूत त्याने 66 धावा केल्या होत्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला होता. मात्र दुसऱ्या डावात तो रूटचा शिकार झाला.

दरम्यान, कांगारूंना आता जिंकण्यासाठी 46 चेंडूत 12 धावांची गरज असून मैदनावर पॅट कमिन्स नाबाद 37 धावा आणि लियॉन 10 धावांवर खेळत आहे. तर इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.