India vs South Africa T20 Series: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची झाली कोरोना चाचणी, काय आहे रिपोर्ट?
भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने (IND vs SA) कोविड-19 च्या तपासणीत सर्व सदस्य हे निगेटीव्ह आले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातीलस सर्व सदस्यांनी मैदानावर सराव सुरू केला आहे.
नवी दिल्ली : दोन महिने चाललेल्या आयपीएल (IPL) सीजननंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता आंतरराष्ट्रीय सीजनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियासमोर पहिलं आव्हान हे दक्षिण आफ्रिकेच आहे. दक्षिण आफ्रिकेचा मजबूत संघ भारतात आला (South Africa India Tour) आहे. मात्र याआधी देशात कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढण्यास सुरूवात केल्यानंतर सगळ्यांचीच डोके दु:खी वाढली आहे. तर सुरू होणाऱ्या मालिकेत कोणताच अडथळा येऊ नये म्हणून T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे. तर त्याचे रिपोर्ट ही आले आहेत. धक्कादायक असा कोणताही रिपोर्ट आलेला नसून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना आनंद झाला आहे. कारण IPLची फिव्हर हा T20 मालिकेत दिसणार आहे.
भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने (IND vs SA) कोविड-19 च्या तपासणीत सर्व सदस्य हे निगेटीव्ह आले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातीलस सर्व सदस्यांनी मैदानावर सराव सुरू केला आहे. तबरेझ शम्सी आणि केशव महाराज हे फिरकीपटू आपल्या निशाना योग्य लागावा म्हणून घाम गाळताना दिसत आहेत. तर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक खुर्चीवर बसून फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहत होता. तर शम्सी आणि महाराजांनंतर अष्टपैलू एडन मार्करामनेही फिरकी गोलंदाजीचा जोरदार सराव केला.
आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK)अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियससह हे त्रिकूट भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पाच वर्षांनंतर संघात पुनरागमन करत असलेल्या वेन पारनेलने सराव केला. तर रॅसी व्हॅन डर डुसेन मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरच्या नेतृत्वाखाली फलंदाजीचा सरावात गुंग होता. त्यानंतर बाउचर मार्क यानसेनला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसला.
दक्षिण आफ्रिकेचा आयपीएल स्टार डेव्हिड मिलर सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत असून तो लवकरच संघात सामील होणार आहे. आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतर प्रोटीज (दक्षिण आफ्रिका) संघाच्या सदस्यांनी गुरुवारी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर त्यांच्या वैकल्पिक सराव सत्रात भाग घेतला. टीमच्या सपोर्ट टीमच्या एका सदस्याने सांगितले की, ‘तपासणीत टीमचे सर्व सदस्य हे निगेटीव्ह आले आहेत. आयपीएलशी संबंधित खेळाडूंना मॅनेजमेंटचा भाग म्हणून मालिकेच्या आधी काही दिवस विश्रांती दिली जाईल.
टी-20 मालिकेतील पहिला सामना हा 9 जून रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला अद्याप टी-20 मालिका जिंकता आलेली नाही. पाहुण्या संघाने 2016 मध्ये दोघांमधील पहिली मालिका जिंकली होती. त्याच वेळी, 2019 मधील मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.