Rinku Singh : GT vs KKR | रिंकू याने फक्त सामनाच नाही जिंकवला तर माहीचा तो रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

थरारक सामन्यात युवा खेळाडू रिंकू सिंग याने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. एकाच ओव्हरमध्ये त्याने सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने या विजयासह एक मोठा रेकॉर्ड नावावर केलेला आहे.

Rinku Singh : GT vs KKR | रिंकू याने फक्त सामनाच नाही जिंकवला तर माहीचा तो रेकॉर्ड मोडत रचला इतिहास
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 9:35 PM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या थरारक सामन्यात युवा खेळाडू रिंकू सिंग याने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. एकाच ओव्हरमध्ये त्याने सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने या विजयासह एक मोठा रेकॉर्ड नावावर केलेला आहे.

केकेआर संघाला 29 धावांची गरज होती त्यावेळी उमेश यादव हा स्ट्राइक वर होता तर गुजरात टायटन्सकडून यश दयाळ बॉलिंग करत होता. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने 1 धाव घेत स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने पाच सिक्स मारत गुजरात संघाचा हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेस करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम हा रिंकू सिंगने केलाय. याआधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर होता. धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीविरूद्ध 24 धावा केल्या होत्या. आता रिंकू सिंगने आजच्या गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हर मध्ये 30 धावा काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

रिंकूने 20 व्याओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवला. त्यासोबतच त्याने भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. 2009 मध्ये रोहित शर्माने केकेआर विरुद्ध शेवटच्या शतकात 22 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तर दोन्हीने 2016 साली पंजाब विरुद्ध बावीस धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना केकेआरला 205 धावांचं लक्ष दिलं होतं या लक्षाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात म्हणावी अशी काही झाली नाही कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये गुरबाजला मोहम्मद शमीने बाद केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या व्यंकटेश अय्यर याने सामन्याच रूप पालटून टाकलं होतं. मात्र अय्यर 83 धावांवर बाद झाला आणि राशिद खान याने हॅट्रिक घेत सामन्यात ट्विस्ट आणला. परंतु मैदानात रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असताना सलग पाच षटकार मारत सामना केकेआरला विजय मिळवून दिला.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.