आयपीएल मेगा लिलावात या तीन खेळाडूंचं नशिब निघणार फुटकं! कोणी विकत घेईल की नाही?

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन यादी समोर आली आहे. त्यामुळे आता ते खेळाडू सोडून मेगा लिलावात इतर खेळाडूंना घेण्यासाठी चढाओढ पाहयाला मिळणार आहे. असं असताना काही खेळाडूंना खरेदीदार मिळणं कठीण असल्याचं दिसत आहे. यात तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. संघात स्थान मिळालं तर मोठी बोली लागणं कठीण आहे.

आयपीएल मेगा लिलावात या तीन खेळाडूंचं नशिब निघणार फुटकं! कोणी विकत घेईल की नाही?
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 5:11 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावाची तयारी सुरु झाली आहे. सौदी अरबच्या रियादमध्ये 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान लिलाव प्रक्रिया पार पडेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या 20 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या मेगा लिलावापूर्वी 10 फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सोपवली आहे. 47 खेळाडू रिटेन झाले असून काही दिग्गज खेळाडू मेगा लिलावात असणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बोली लागणार यात काही शंका नाही. पण या मेगा लिलावात तीन दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची दाट शक्यता आहे. या खेळाडूंनी एक काळ गाजवला आहे. पण आता त्यांचा फॉर्म आणि वय पाहता बोली लागणं कठीण आहे. या यादीत अमित मिश्रा, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांचं नाव असू शकतं. त्यामुळे या खेळाडूंना भाव मिळणार की नाही हे मेगा लिलावातच स्पष्ट होईल.

अमित मिश्राचं आयपीएल करिअर खूप मोठं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचं नाव आहे. अमित मिश्राने 162 सामन्यात 174 विकेट घेतल्या आहेत. पण असं असूनही लखनौ सुपर जायंट्सने रिटेन केलं नाही. मागच्या पर्वात फक्त एक सामना खेळला होता. त्यामुळे मेगा लिलावात अमित मिश्राला भाव मिळतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मागच्या पाच पर्वात इशांत शर्मा दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळत आहे. पण यावेळी दिल्लीने त्याला रिटेन केलं नाही. इशांतने आयपीएलमध्ये 92 विकेट घेतल्या आहेत. पण त्याच्या गोलंदाजीची धार पूर्वीसारखी राहिली नाही, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे दिल्लीने त्याला रिलीज केलं. त्यामुळे मेगा लिलावात उतरला तरी त्याच्यावर पैसा खर्च करणं कठीण दिसत आहे.

अजिंक्य रहाणे आयपीएलच्या 16 पर्वात खेळला आहे. त्याने आतापर्यंत 4642 धावा केल्या आहेत. मागच्या दोन पर्वात त्याची कामगिरी ठिकठाक राहिली. पण यंदा त्याला चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलं नाही. त्याच्या स्ट्राईक रेटमुळे त्याला रिलीज केलं असावं अशी चर्चा आहे. त्यामुळे स्ट्राईक रेट पाहता त्याला कोणती फ्रेंचायझी मिळणं कठीण आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.