आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, टी नटराजनला नवी कोरी गाडी भेट!

नटराजनच्या शानदार बोलिंग फरफॉर्मन्सने खूश झालेल्या प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नटराजनला एक महिंद्रा गाडी देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा यांनी आश्वासन पाळलं आहे. (Anand Mahindra Gifted Car To N Natrajan)

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, टी नटराजनला नवी कोरी गाडी भेट!
Anand Mahindra Gifted Car To N Natrajan
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 7:12 AM

मुंबईटी नटराजन ( N Natrajan), भारताचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज जो यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल 2020 मध्ये केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर यंदाच्या साली झालेल्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आणि शानदार गोलंदाजी केली. नटराजनच्या शानदार बोलिंग फरफॉर्मन्सने खूश झालेल्या प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नटराजनला एक महिंद्रा गाडी देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा यांनी आश्वासन पाळलं आहे. महिंद्रा यांनी पाठवलेली गाडी नटराजनला  मिळाली आहे. गाडीचे काही फोटो नटराजनने ट्विट केले आहेत. सोशल मीडियावर महिंद्रा आणि नटराजन यांची एकच चर्चा पाहायला मिळतीय.  (Anand Mahindra Gifted Car To N Natrajan)

नटराजनचा बोलिंग परफॉर्मन्स आवडला, गाडी भेट देण्याची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात टी नटराजनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या याच मॅचचा बोलिंग परफॉर्मन्स महिंद्रा यांना आवडला होता. हाच परफॉरमन्स पाहून महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट देण्याची घोषणा केली होती. अखेर आयपीएलआधी महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट दिली आहे. गाडीसोबतचे फोटो ट्विट करुन नटराजनने महिंद्रा यांना धन्यवाद दिले आहेत.

नटराजनचं महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट…

टी नटराजजने देखील आनंद महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये जी जर्सी नटराजनने परिधान केली होती. त्या जर्सीवर सही करुन ती जर्सी त्याने महिंद्रा यांना दिली आहे.

महिंद्रा यांचं गिफ्ट मिळाल्यावर नटराजन काय म्हणाला?

भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे. माझा प्रवास खूपच कठीण रस्त्याने झालाय. परंतु याच रस्त्यावर मला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याच बळावर मी चांगलं प्रदर्शन करु शकलो. आज मी महिंद्रा यांचं गिफ्ट स्वीकारतोय त्या वेळी मला भरुन आलंय. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली”

(Anand Mahindra Gifted Car To N Natrajan)

हे ही वाचा :

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!

IPL 2021 : ‘महामानव चेन्नईत पोहोचला’, आरसीबीचं धमाल ट्विट, आयपीएल गाजवण्यासाठी डिव्हिलियर्स सज्ज!

IPL 2021 : धोनीचं शस्त्र सज्ज, बॅटला धार चढवली, छन्‍नी-हातोड्याने बॅटला शेप, पाहा VIDEO

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.