IND vs SL : भारत श्रीलंका टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी आणखी धक्का, या खेळाडूला रुग्णालयात केलं दाखल
भारत श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आणखी एक खेळाडू आऊट झाला आहे. त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
भारत श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी20 मालिकेला दुखापतीचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे. श्रीलंकेचा नुवान तुषारा, दुष्मंथआ चमिरा दुखापतगस्त झाले होते. त्यानंतर मोहम्मद सिराजलाही दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. असं सर्व सुरु असताना पहिला सामना सुरु होण्याच्या काही तासांआधी आणखी एक वाईट बातमी समोर आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो याची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. श्रीलंकन बोर्डाने ही माहिती आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दिली आहे. श्रीलंकन बोर्डाने लिहिलं की, ‘वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडोला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याच्या जागी रमेश मेंडिस याचा तात्पुरता संघात समावेश केला आहे.’आजारी बिनुरा फर्नाांडो मालिकेपूर्वी बरा होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे फर्नांडो टी20 मालिकेला मुकू शकतो.
मालिकेपूर्वी श्रीलंकेला बिनुराच्या रुपाने बसलेला हा तिसरा धक्का आहे. यापूर्वी स्टार गोलंदाज नुवान तुषारा बोटाच्या दुखापतीमुळे, तर दुष्मंथा चमिराही जखमी झाल्याने स्पर्धेतून बाद झाला. आता बिनुराच्या आजारपणामुळे श्रीलंकन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना 27 जुलै, दुसरा टी20 सामना 28 जुलैला, तर तिसरा टी20 सामना 30 जुलैला होणार आहे.
🚨Binura Fernando has been hospitalized as the player is suffering from a chest infection.
Ramesh Mendis has been brought into the squad as a standby player. #SLvIND pic.twitter.com/aR25DtAb5s
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 26, 2024
दोन्ही संघांचे खेळाडू
टी 20 मालिकेसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.